IND vs BAN, U19 World Cup 2020 Final: टीम इंडिया 177 धावांवर ऑलआऊट, अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये बांग्लादेश ला दिले 178 धावांचे लक्ष्य

भारत पहिले बॅटिंग करत 47.2 ओव्हरमध्ये 177 धावांवर ऑलआऊट झाला. बांग्लादेशने सुरुवातीपासून भारतावर वर्चस्व गाजवले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने एकटा संघर्ष केला आणि सर्वाधिक 88 धावा केल्या.

भारत विरुद्ध बांग्लादेश अंडर-19 विश्वचषक (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) मधील अंडर-19 विश्वचषक फायनल दक्षिण आफ्रिकामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला पहिले बॅटिंग करण्यासाठी बोलावले. बांग्लादेशी गोलंदाजांनी कर्णधारचा निर्णय योग्य ठरवाल आणि भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासून प्रत्येक धावसाठी संघर्ष करायला लावला. भारत पहिले बॅटिंग करत 47.2 ओव्हरमध्ये 177 धावांवर ऑलआऊट झाला. बांग्लादेशने सुरुवातीपासून भारतावर वर्चस्व गाजवले. भारताकडून यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने एकटा संघर्ष केला आणि सर्वाधिक 88 धावा केल्या. तिलक वर्माने 38 धावांचे योगदान दिले. बांग्लादेशने आज त्यांच्या फिल्डिंगद्वारे भारताला भरपूर त्रास दिला. त्यांच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज निरुत्तर राहिले. शॉरिफुल इस्लाम (Shoriful Islam) 2, तन्झिम हसन सकीब, अविशेक दासने प्रत्येकी 1 गडी बाद केला. (U19 World Cup 2020: दिव्यांश सक्सेना च्या डोक्यावर बांग्लादेशी गोलंदाजाने रागात फेकून मारला बॉल, संतप्त Netizens ने लगावली फटकार)

भारताच्या फलंदाजांनी आज निराशाजनक कामगिरी केली. दबावामुळे भारताने पहिली विकेट गमावली. दिव्यंश सक्सेना 17 चेंडूत 2 धावा करून अविषेक दासच्या चेंडूवर हसनकडे झेलबाद झाला. 9 धावांवर भारताला पहिला धक्का बसला, पण त्यानंतर यशस्वी आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरला आणि स्कोअर 100 पर्यंत नेला. जयस्वालने या विश्वचषकातील 5 वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, टिळक 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्यावर झेलबाद झाला. कर्णधार प्रियम गर्गच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला ज्याने 7 धावा केल्या. यांनतर जयस्वाल 88 च्या वैयक्तिक धावांवर आऊट झाला. 22 धावा करून ध्रुव जुरेल रनआऊट झाला. यानंतर भारताने पाच विकेट्स फक्त 14 धावांवर गमावले. आज 7 भारतीय फलंदाज दहाचा आकडाही पार करू शकले नाही. अंडर-19 वनडेमध्ये मागील 11 सामन्यानंतर ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आजच्या सामन्यात भारताकडून ध्रुव चंद जुरेल आणि रवी बिश्नोई धावबाद झाले. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी बांगलादेश संघात बदल करण्यात आला, तर भारत मागील सामन्यातील प्लेयिंग इलेव्हनसह खेळत आहे. आजच्या फायनलमध्ये भारत पाचवे तर बांग्लादेश पहिले जेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now