IND vs BAN U19 World Cup 2020 Final: बांग्लादेशने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही टीमचे प्लेयिंग इलेव्हन
भारत आणि बांग्लादेश संघ आज दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषकच्या फायनलमध्ये आमने-सामने येतील.. या सामन्यापूर्वी झालेल्या टॉसमध्ये बांग्लादेशने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ आज दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषकच्या (World Cup) फायनलमध्ये आमने-सामने येतील.. या सामन्यापूर्वी झालेल्या टॉसमध्ये बांग्लादेशने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेत्या भारताची ही 7 वी अंतिम फेरी आहे आणि संघाला 5 व्यांदा विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. यंदा स्पर्धेत टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. सेमीफायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत केले. 2000 मध्ये भारत पहिल्यांदा चॅम्पियन बनला. त्यानंतर 2006 मध्ये उपविजेतेपद, 2008 आणि 2012 मध्ये विजेतेपद, 2016 मध्ये उपविजेते आणि 2018 मध्ये विजेतेपद मिळविले. दुसरीकडे, बांग्लादेशने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. सेमीफायनल सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला.
दरम्यान, विश्वचषकच्या फायनलमध्ये दोन्ही संघ मजबूत प्लेयिंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही, मात्र बांग्लादेशने एक बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेत यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 5 सामन्यात 156 च्या सरासरीने 312 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 13 गडी बाद केले आहेत. याशिवाय कार्तिक त्यागीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. बांग्लादेशकडून महमूदुल हसन जॉयमी 5 सामन्यात सर्वाधिक 176 धावा केल्या, तर रकीबुल हसनने 5 सामन्यात सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या.
पाहा फायनलमधील भारत-बांग्लादेशचे प्लेयिंग इलेव्हन
भारत: यशस्वी जयसवाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग (कॅप्टन), ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, शाश्वत रावत, कार्तिक त्यागी आणि आकाश सिंह.
बांग्लादेश: परवेज हुसैन, तनजीद हसन, महमुद्दलाह हसन जॉय, ताउहिद हृद्य, शाहदत हुसैन, अविशेक दास, अकबर अली (कॅप्टन), शमीम हुसैन, रकीबुल हसन, शोरीफुल इस्लाम आणि तनजीम हसन शकीब.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)