IND vs BAN T20I 2019: बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 'हे' 3 फलंदाज घेऊ शकतात टीम इंडियामध्ये विराट कोहली याची जागा, जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश संघात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघात 4 फलंदाज आहे जे बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी विराटची जागा घेऊ शकतात. कोहलीची अनुपस्थिती भारतीय क्रिकेटमध्ये जागा निर्माण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक युवा क्रिकेटपटूसाठी दरवाजे उघडेल.

विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी बांग्लादेश आणि भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघात एक  करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याला कर्णधारपदाची जबाबदार देण्यात आली. आहे. जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध पाच वनडे मालिकेतिल तीन सामने खेळल्यानंतर कोहलीने अखेरची विश्रांती घेतली होती, त्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलिया, नंतर आयपीएल, विश्वचषक, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध सलग सामने खेळला आहेत. त्यामुळे, कोहलीच्या वर्कलोडकडे पाहता त्याला आगामी बांग्लादेशविरुद्ध मर्यादित षटकारांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण, आता मालिकेसाठी भारतीय संघात विराटची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (IND vs BAN Test 2019: ईडन गार्डन्सवर BCCI खेळवू शकते पहिली Day/Night टेस्ट मॅच, बांग्लादेश बोर्डला दिला प्रस्ताव)

भारतीय संघात 4 फलंदाज आहे जे बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी विराटची जागा घेऊ शकतात. कोहलीची अनुपस्थिती भारतीय क्रिकेटमध्ये जागा निर्माण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक युवा क्रिकेटपटूसाठी दरवाजे उघडेल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिला सामना खेळला जाईल, तर राजकोट आणि नागपूरमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळला जाईल. इथे आपण पाहूया, बांग्लादेशविरूद्ध आगामी मालिकेसाठी कोहलीचे तीन संभाव्य बदली:

संजू सॅमसन

संजू, घरगुती क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी करत आहे.दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध प्रभावी छाप पाडल्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही प्रभावित केले. 58.57 च्या सरासरीने सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 410 धावा केल्या आणि बर्‍याच वेळानंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले. गोव्याविरुद्ध 212 धावांचा डाव खेळत संजूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला. विशेष म्हणजे संजूने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही कामगिरी केले. दुसरीकडे, संजू चांगला विकेटकीपर देखील आहे. त्यामुळे, रिषभ पंत याच्याऐवजी संजूला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देणे संघासाठी दुहेरी फायद्याचे ठरू शकते.

के एल राहुल

वेस्ट इंडिज दौऱ्यावर प्रभावी कामगिरी न केल्याने राहुलला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी बाहेर करण्यात आले होते. राहुलच्या खराब कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची प्रतिमा सातत्याने कमकुवत होत आहे. पण, संघातून बाहे पडल्यावर राहुलने विजय हजारेमध्ये खूप धावा केल्या. कर्नाटकच्या राहुलने या स्पर्धेत पाच अर्धशतक आणि शतक झळकावले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राहुल तिसऱ्या स्थानावर राहिला. राहुलने सलामी फलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. पण, आता कोहलीची अनुपस्थिती आणि राहुलचा फॉर्म पाहता त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.

मनीष पांडे

मनीषकडे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. आयपीएलनंतर त्याला वेस्ट इंडिज दौर्यासाठीही वनडे आणि टी-20 संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये सहभाग होऊ शकला नाही. त्याच्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 सामन्यासाठीही मनीषला संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे, आगामी बांग्लादेशविरुद्ध मालिकेसाठी मनीषला संधी देऊन त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाते की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

असा आहे भारताचा टी-20 संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, के एल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युझवेन्द्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खालील अहमद, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now