IND vs BAN Dream11 Team Prediction: भारत-बांगलादेशमध्ये आज पहिला टी-20 सामना; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

ग्वाल्हेरच्या नवीन स्टेडियमवर प्रथमच कोणता सामना खेळवला जात आहे. तो आंतरराष्ट्रीय सामना भारत-बांगलादेशमध्ये होत आहे.

IND vs BAN Dream11 Team Prediction: भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज होत आहे. ग्वाल्हेरच्या नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानात लाल मातीची खेळपट्टी आहे. जी चांगली उसळी आणि वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. मालिकेतील पहिला सामना आज याआधी दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळले होते. टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.

अशा स्थितीत आता पहिल्या टी20 सामन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्लेइंग इलेव्हन, पीच रिपोर्ट आणि मॅच प्रीडीक्शन काय असू शकते, ते जाणून घेऊया. (हेही वाचा: India vs Bangladesh 1st T20 Pitch Report: ग्वाल्हेरच्या मैदानावर कोणाचे असणार वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज? येथे जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

भारत आणि बांगलादेश पीच रिपोर्ट

ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट या नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. या मैदानात लाल मातीची खेळपट्टी आहे. जी चांगली उसळी आणि वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जात आहे. येथे सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते, पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फलंदाजांसाठी फलंदाजी सोपी होत जाईल.

भारत-बांगलादेश मॅच प्रीडिक्शन

टीम इंडियाने अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला. मात्र, या कसोटीत टीम इंडियाची स्थिती खूपच वेगळी होती. टी-20 मध्ये भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा या सामन्यात वरचष्मा असेल.

पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा.

पहिल्या टी-20 साठी बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- तनजी हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन सांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, झेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तन्झीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम/तस्कीन अहमद.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif