IND vs BAN 3rd T20I: दीपक चाहर याची हॅटट्रिक; बांग्लादेशचा धावांनी पराभव करत टीम इंडियाने 2-1 ने जिंकली मालिका

टीम इंडियाकडून दीपक चाहरने 6 आणि शिवम दुबेने 3 गडी बाद केले, युजवेंद्र चहलला 1 विकेट मिळाली.

भारत-बांग्लादेश (Photo Credit: Getty Images)

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. सामना आणि मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने बांगलादेशला 175 धावांचे लक्ष्य दिले होते. दोन्ही संघात थरारक सामना रंगला. बांग्लादेशच्या फलंदाजांनी मधल्या ओव्हरमध्ये जोरदार फलंदाजी केली आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात बांग्लादेश संघाचा कर्णधार महमूदुल्ला याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 174 धावा केल्या. बांग्लादेशला निर्धारित 20 ओव्हरमध्ये धावा करता आल्या. टीम इंडियाकडून दीपक चाहर (Deepak Chahar) याने 6 आणि शिवम दुबे (Shivam Dube) याने 3 गडी बाद केले, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला 1 विकेट मिळाली. चाहरने 7 धावांवर 6 विकेट घेतल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये चाहरने हॅटट्रिकही मिळवली.  (IND vs BAN 3rd T20I: के एल राहुल, श्रेयस अय्यर यांच्या झुंझार खेळीचं कौतुक; तर शिखर धवन, रिषभ पंत यांना संघातून वगळण्याची केली मागणी, पहा Tweets)

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांग्लादेशी संघाला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. डावाच्या तिसर्‍या ओव्हरमध्ये पहिले लिटन दास याला 9 धावांवर चहरने बाद केले आणि दुसऱ्याच चेंडूवर एकही धाव न करत सौम्या सरकार माघारी परतला. याच्यानंतर मोहम्मद मिथुन आणि मोहम्मद नईम यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी 98 धावांची भागीदारी केली. या दोघांची भागीदारी डोकेदुखी ठरत असताना चाहरने संघाला तिसरे यास मिळवून देत मिथुनला 27 धावांवर बाद केले. याच्यानंतर बांग्लादेशी विकेट पाडण्याचे सत्र सुरु राहिले. याच्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या शिवम दुबे याने धोकादायक मुशफिकुर रहीम याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. मुशफिकुर शून्यावर माघारी परतला. मुशफिकुरनंतर नईम आणि अफीफ हुसेन हेदेखील दुबेचे बळी बनले.

यापूर्वी भारताकडून पहिले फलंदाजी करत के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. राहुलने 52, तर श्रेयसने 62 धावांचे महत्वाचे योगदान दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif