IND vs BAN 2019 Test: डे-नाईट टेस्ट मॅचपूर्वी टीम इंडियाची खास विनंती; विराट कोहली आणि संघ इंदोरमध्ये करणार 'नाईट शिफ्ट', वाचा सविस्तर
आयएएनएसशी बोलताना, एमपीसीएचे माजी सचिव मिलिंद कानमाडीकर यांनी याची पुष्टी केली आणि ते म्हणाले की, संघाने इंदोरमध्ये गुलाबी चेंडूंसह जुळवून घेण्यासाठी संघाला मदत करण्यासाठी ते आनंदी आहे.
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना गुरुवारी 14 नोव्हेंबरपासून इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियमवर (Holkar Stadium) खेळला जाईल. परंतु या सामन्यापेक्षा क्रिकेट चाहत्यांना दोन्ही संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा केली जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन (Eden Gardens) वर खेळला जाणार आहे. आणि या सामन्याची खास बाब म्हणजे गुलाबी बॉलने खेळला जाणारा टीम इंडियाचा हा पहिला डे-नाईट टेस्ट सामना असेल. टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या देखरेखीखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संघाच्या अनेक खेळाडूंनी गुलाबी बॉलबरोबर खेळण्याची तयारी दर्शविली होती, आता इंदोर कसोटीदरम्यानही खेळाडू डे-नाईट कसोटीच्या तयारीत कसलीही कसर सोडत नाहीत. टीम इंडियाचे खेळाडू डे-नाईट सामन्याला गांभीर्याने पाहत आहे. आणि आता टीम इंडियाने मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडे रात्रीच्या वेळी सराव सत्र आयोजित करण्याची मागणी केली आहे. (IND vs BAN T20I 2019: दीपक चाहर याच्या टी-20 हॅटट्रिकवर BCCI ने केले ट्विट, Netizens ने ट्रोल करत सुधारली चूक, पहा Tweets)
आयएएनएसशी बोलताना, एमपीसीएचे माजी सचिव मिलिंद कानमाडीकर (Milind Kanmadikar) यांनी याची पुष्टी केली आणि ते म्हणाले की, संघाने इंदोरमध्ये गुलाबी चेंडूंसह जुळवून घेण्यासाठी संघाला मदत करण्यासाठी ते आनंदी आहे. "आमच्याकडे भारतीय संघाकडून विनंती करण्यात आली की त्यांनी गुलाबी बॉल टेस्टसाठी तयारी करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रशिक्षण द्यायचे आहे, त्यामुळे आम्ही त्यासाठी व्यवस्था करणार आहोत." यापूर्वी BCCI.tv शी बोलताना टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने गुलाबी बॉलसह खेळल्यामुळे येणाऱ्या आव्हानांशी जुळवून घेण्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. ईडन कसोटीसाठी खेळाडू पूर्णपणे तयार आहेत याची खात्री करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली कोणतीही कसर ठेवत नाहीत.
मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांग्लादेश संघ इंदोरला पोहोचले आहेत. रविवारी तीन सामन्यांच्याटी-20 मालिकेत भारताने बांग्लादेशचा 2-1 ने पराभव केला होता.