शिवम दुबे याची स्वतः सोबत केलेल्या तुलनेवर 'सिक्सर किंग' युवराज सिंह याने केले 'हे' मोठे विधान, वाचा सविस्तर
याविषयी जेव्हा युवराजला विचारले गेले, तेव्हा त्याने स्पष्टपणे आपले मत प्रदर्शित केले.
टीम इंडिया आणि बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघ यांच्यात दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून (Indian Team) एक नवीन खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातून मुंबईचा युवा खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला. शिवमने बांग्लादेश पहिल्या टी-20 मॅचमधून क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात पदार्पण केले. या मॅचपूर्वी बीसीसीआयने 26 वर्षीय शिवमचा एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्याच्या खेळण्याच्या शैली आणि फलंदाजीची काही झलक पाहायला मिळाली. याच्यानंतर शिवमची माजी क्रिकेटपटू आणि 'सिक्सर किंग'च्या नावाने प्रसिद्ध युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्याशी तुलना केली जाऊ लागली.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेकांना शिवममध्ये युवराजची झलक पाहायला मिळाली. याविषयी जेव्हा युवराजला विचारले गेले, तेव्हा त्याने स्पष्टपणे आपले मत प्रदर्शित केले. मुंबईत पीटीआयशी बोलताना युवराज आपल्या तुलना शिवम दुबेवर म्हणाले की, "आधी त्याला (शिवम) कारकीर्द सुरू करू द्या आणि त्यानंतर जेव्हा तो एखादी पातळी गाठते, तेव्हा आपण एखाद्याशी त्याची तुलना करा."
युवराज पुढे म्हणाला, '' माझ्याशी त्याची तुलना केली पाहिजे असे मला वाटत नाही. त्याची आपली वेगळी एक ओळख असली पाहिजे. त्याच्यात प्रतिभा आहे." पदार्पणाच्या सामन्यात शिवमची सुरुवात चांगली झाली नाही. या सामन्यात शिवमला फक्त एक धावा करता आल्या आणि गोलंदाजीत त्याला शेवटची ओव्हर फेकली, ज्यामध्ये तो फक्त तीन चेंडू टाकले आणि बांग्लादेशने 9 धावा करत सामना जिंकला.