खुशखबर! एमएस धोनी बनणार IND vs BAN पहिल्या Day/Night टेस्टचा भाग, पहिल्यांदा निभावणार 'ही' भूमिका, जाणून घ्या
या ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट सामन्यापूर्वी धोनीला यामध्ये सामील करण्याच्या तयारी सुरु आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्या बांग्लादेशविरुद्ध पहिल्या डे-नाईट टेस्टचा भाग होऊ शकतो. इतकेच नाही तर या टेस्टदरम्यान कॉमेंटेटर म्हणून दिसणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आता क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. भारतात (India) पहिल्यांदा डे-नाईट टेस्ट (Day/Night Test) मॅचचे आयोजन केले जात आहे. बांग्लादेश संघ (Bangladesh Team) सध्या भारत दौऱ्यावर आहे. आणि यादरम्यान दोन्ही संघात पहिला डे-नाईट टेस्ट सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. आणि या ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट सामन्यापूर्वी धोनीला यामध्ये सामील करण्याच्या तयारी सुरु आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक सेमीफायनल नंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. पण, आता तो कोलकातामध्ये खेळल्या जाणार्या बांग्लादेशविरुद्ध पहिल्या डे-नाईट टेस्टचा भाग होऊ शकतो. इतकेच नाही तर या टेस्टदरम्यान धोनी, कधी न पहिल्या गेलेल्या भूमिकेत दिसेल. भारत-बांग्लादेश संघातील पहिला डे-नाईट टेस्ट सामना 22 ते 26 नोव्हेंबरला खेळला जाईल. (ऑलिम्पिक पदकविजेतांचा सन्मान, शालेय मुलांना मोफत Pass; भारताची पहिली डे/नाईट टेस्ट अविस्मरणीय करण्यासाठी BCCI सज्ज)
कोलकाताच्या ईडन गार्डन येथे भारत-बांगलादेश डे-नाईट टेस्ट सामन्यादरम्यान, धोनी सामन्याच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी पाहुणा कॉमेंटेटर म्हणून दिसणार आहे. मॅच प्रसारित चॅनेल, स्टारने धोनीला डे-नाईट टेस्टच्या पहिल्या दिवशी अतिथी म्हणून कमेंटरी बॉक्समध्ये यायचेच निमंत्रण दिले आहे. 22 नोव्हेंबरला सामन्याच्या पहिल्या दिवशी धोनीने मॅचची कॉमेंट्री करताना दिसेल. स्टारने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला पिंक बॉल टेस्टसाठी प्रस्तावित केलेल्या योजनेचा हवाला देत, आयएएनएसच्या वृत्तानुसार, या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय संघातील सर्व माजी कर्णधार संघाच्या कसोटी इतिहासातील आवडीचे क्षण सांगतील. आणि जर हा अहवाल सत्य मानले तर, धोनीने याचे आमंत्रण स्वीकारले आहे आणि ‘कॅप्टन कूल’ पहिल्यांदा कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसेल.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्षपद सांभाळल्यानंतर भारताच्या इतिहासात एक मोठा निर्णय घेतला. भारतीय संघ पहिल्यांदाच डे नाईट टेस्ट खेळणार आहे. याशिवाय, अहवालानुसार या योजनेत असे म्हटले आहे की कसोटीच्या तिसर्या दिवशी लंचदरम्यान, भारताचा 2001 मध्ये ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध विजयही साजरा केला जाईल.