IND vs BAN 1st Test: रोहित शर्मा याने Lunch ब्रेक दरम्यान केला स्लीप कॅचिंगचा सराव, मग मोहम्मद शमी याला मिळवून दिली महत्वाची विकेट, पाहा Video
मात्र, दुसऱ्यांदा रोहितने काही चूक केली नाही. रोहितने लंचपूर्वी शमीच्या बॉलवर रहीमचा झेल सोडला. यानंतर लंच ब्रेक दरम्यान रोहित आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसला.
इंदोरमध्ये सुरु असलेल्या भारत-बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेश संघ पराभव टाळण्यासाठी धडपडत आहे. निम्मा संघकेवळ 72 च्या स्कोअरवर मंडपात परतला, तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने टीम इंडियासाठी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तिसरी विकेट शमीला रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मिळवून दिली. यापूर्वी दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहितला शमीच्याच गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल पकडण्याची संधी होती, पण ती त्याने गमावली. मात्र, दुसऱ्यांदा रोहितने काही चूक केली नाही. भारतीय गोलंदाज ज्या वेगाने खेळ करत आहे असे दिसतेय की टीम इंडिया शनिवारी सामना जिंकण्याच्या उद्देशाने खेळत आहे. लंचच्या आधी बांग्लादेशने चार गडी गमावले होते. पहिल्या सत्रात दुपारच्या जेवणानंतर महमूदुल्ला आणि मुशफिकुर रहीम यांनी संघाला 50 धावांवर नेले.
टीम इंडियाला पाचव्या विकेटसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही, केवळ 5 षटकानंतर शमीने महमूदुल्लाला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. शमीच्या चेंडूने महमुदुल्लाच्या बॅटच्या कडेला लागून दुसर्या स्लिपपर्यंत गेली, आणि यावेळी रोहितने झेल पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. यापूर्वी रोहितने लंचपूर्वी शमीच्या बॉलवर रहीमचा झेल सोडला. रहिम नुकताच फलंदाजीसाठी येत स्थिर होण्याचा प्रयत्न करीत होता परंतु मोहम्मदच्या शानदार चेंडू त्याच्या बॅटच्या लागून थेट रोहितकडे गेला, मुंबईकर तो झेल पकडण्यास अपयशी राहिला. यानंतर लंच ब्रेक दरम्यान रोहित आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसला. आणि लंचनंतरचे सत्र सुरू झाल्यानंतर रोहितने दुसर्या स्लिपवर शानदार झेल पकडला आणि महमूदुल्लाला शमीच्या चेंडूवर माघारी धाडले. पाहा हा व्हिडिओ:
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी टीम इंडियाने सहा गडी गमावल्यानंतर 493 धावांवर डाव घोषित केला आणि डावाचा पराभव टाळण्यासाठी बांग्लादेशला 343 धावांचे लक्ष्य दिले. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया विजयापासून फक्त 2 विकेट दूर आहे.