IND vs BAN 1st Test: भारतीय वेगवान गोलंदाजांची प्रभावी खेळी, बांग्लादेशविरुद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवत घेतली 1-0 अशी आघाडी

टीम इंडियाने ठेवलेल्या 343 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात बांग्लादेश संघ दुसर्‍या डावात धावांवर ऑल आऊट झाला. इंदोरमधील सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: IANS)

इंदोरमधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेश (Bangladesh) वर एक डाव आणि 130 धावांवी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ठेवलेल्या 343 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात बांग्लादेश संघ दुसर्‍या डावात धावांवर ऑल आऊट झाला. भारतासाठी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने संघासाठी सर्वाधिक 4 गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन यांने 3, उमेश यादव याने 2 तर इशांत शर्मा याने 1 गडी बाद केला. बांग्लादेश संघ पहिल्या डावात 150 धावांवर ऑल आऊट झाला. नंतर, भारताने पहिल्या 493 धावांचा विशाल स्कोर उभारला. इंदोरमधील सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. आता दोन्ही संघात कोलकातामध्ये ईडन गार्डन्सवर दुसरा सामना खेळला जाईल. दोन्ही संघातील हा सामना डे-नाईट असणार आहे. भारत-बांग्लादेश पहिल्यांदा डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने सर्वाधिक 68 धावा केल्या. मेहिदी हसन 38, लिटन दास 35, मोहम्मद मिथुन 18 आणि महमुल्लाह याने 15 धावांचे योगदान दिले. (IND vs BAN 1st Test: रोहित शर्मा याने Lunch  ब्रेक दरम्यान केला स्लीप कॅचिंगचा सराव, मग मोहम्मद शमी याला मिळवून दिली महत्वाची विकेट, पाहा Video)

या विजयसह आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आणखी 60 गुण मिळवून संघाने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताने 6 टेस्ट सामन्यात 300 गुण मिळवत टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान कायं ठेवले आहेत. दरम्यान, इंदोर सामन्यात बांग्लादेश संघाचा कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haque) याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला 150 धावांवर ऑल आऊट केले. यानंतर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा याच्या प्रभावी खेळीनंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 493 धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसर्‍या डावात फलंदाजी करणारा बांग्लादेश संघ (Bangladesh Team) 213 धावांनी बाद झाला आणि पहिला सामना डाव आणि 130 धावांनी गमावला.

पहिल्या मॅचमध्ये भारताकडून शमीने एकूण 7 विकेट घेतल्या, अश्विन याने 5 आणि उमेश यादवने 4 विकेट घेतल्या. बांग्लादेशविरुद्ध या विजयाने भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळताना आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. यापूर्वी संघाने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट मालिकाही जिंकली होती.



संबंधित बातम्या