IND vs AUS Test 2021: भारतीय कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी, शार्दूल ठाकूरचाही समावेश
रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार असल्याची पुष्टीही बीसीसीआयने केली.
IND vs AUS Test Series 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) उर्वरित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना भारताच्या कसोटी संघात (India Test Team) स्थान देण्यात आले आहे, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार असल्याची पुष्टीही बीसीसीआयने (BCCI) केली. विराट कोहली भारतात परतला असल्याने चेतेश्वर पुजाराकडे मेलबर्न कसोटीसाठी (Melbourne Test) उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, मात्र आता रोहित शेवटच्या दोन सामन्यांत संघात दाखल झाल्यामुळे रहाणेला मदत करणार आहे. मेलबर्न येथे दुसर्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) तिसर्या दिवशी उमेश यादवच्या स्नायूंमध्ये ताणतणाव निर्माण झाल्याने त्याला उर्वरित दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली होती. नंतर त्याचे स्कॅन झाले ज्यात त्याला उर्वरित दोन कसोटी सामन्यांपूर्वी पूर्णपणे फिट होण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने त्याला मालिकेतून बाहेर केले गेले. (Umesh Yadav याला मिळाली गुड न्यूज, चिमूलकीच्या आगमनाची टीम इंडिया गोलंदाजाने खुशखबर, पहा Post)
बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी, शार्दुल ठाकूरचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. ज्येष्ठ वेगवान गोलंदाज शमीच्या उजव्या हाताच्या मागील भागाला फ्रॅक्चर झाल्यांनतर ठाकूरचा समावेश करण्यात आला होता. नटराजनने आतापर्यंत नेटमध्ये प्रभावी गोलंदाजी केली असल्याचे कळत आहे परंतु तिसर्या कसोटीसाठी शार्दुलला संधी मिळेल असे प्राथमिक संकेत आहेत. नटराजनने यापूर्वी डाऊन अंडर आंतरराष्ट्रीय वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले, त्यामुळे आता त्याला कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधेही संधी मिळते की नाही हे पाहणे मजेदार ठरणार आहे. “शमी आणि उमेश यादव हे दोघेही जखमींच्या पुनर्वसनासाठी बेंगलोर येथील नॅशनल क्रिकेट अकादमी येथे जातील. रोहित शर्माने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो मेलबर्नमध्ये भारतीय क्रिकेट संघात सामील झाले आहेत,” बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले.
टीम इंडियाचा सुधारित कसोटी संघः अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साह (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन.