IND vs AUS Test 2020: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास

पण त्यामुळे, टीम इंडियासाठी खुशखबर समोर आली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोर येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने फिटनेस चाचणी पास केली आहे. आयपीएल दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs AUS Test 2020: 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. पण त्यामुळे, टीम इंडियासाठी (Team India_ खुशखबर समोर आली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोर येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने फिटनेस चाचणी (Rohit Sharma Fitness Test) पास केली आहे. आयपीएल दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) मर्यादित ओव्हरच्या मालिकेला मुकावे लागले होते. मात्र, रोहित तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता मिटली असून टीम इंडियाचा सलामी फलंदाज लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर रोहितला 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असेल, ज्यामुळे तो पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. (IND v AUS 2020 Test: खुशखबर! MCG मध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग-डे टेस्टसाठी CAने दर्शक संख्येत केली वाढ)

ANI शी बोलताना घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, कठोर आंतरराष्ट्रीय क्रिकेट फलंदाज तंदुरुस्त आहे. "तो फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला आहे आणि भविष्यातील कारवाईचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समिती घेईल," अशी माहिती सूत्रांनी दिली. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला सुरुवातीच्या दौऱ्यातून वगळल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्याच्या निर्णयाची माहिती नोव्हेंबर महिन्यात बीसीसीआयने दिली होती.

10 नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या अंतिम फेरीत भाग घेतलेले भारतीय खेळाडू दुबईत त्याच रात्रीच राष्ट्रीय संघात दाखल झाले होते, मात्र रोहित पुन्हा भारतात परतला होता आणि नंतर त्याचे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी NCAमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून रोहितला बाहेर केले असल्याने त्याला अंतिम दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करायचे असल्याने रोहितला पहिल्या दोन सामन्यात खेळणे कठीण होते. दुसरीकडे, 26 नोव्हेंबर रोजी कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला की रोहित संपूर्ण संघासह ऑस्ट्रेलियाच्या विमानात का नाही याची आपल्याला कल्पना नव्हती.



संबंधित बातम्या