IND vs AUS Sydney Test 2021: पाकिस्तानी फॅनही झाले टीम इंडियाचे मुरीद, आपल्या टीमला देऊन टाकला हा सल्ला, पहा Video
टीम इंडियाच्या या खेळीचे फक्त देशभरातच नाही शेजारी देश, पाकिस्तानी जनता देखील मुरीद झाली आहे आणि त्यांनी आपल्या टीमला भारतीय संघाकडून शिकण्याचा सल्लाच देऊन टाकला.
IND vs AUS Sydney Test 2021: बरेच जखमी खेळाडू, उत्कटता, उच्च आत्मविश्वास आणि सामना वाचविण्याची आशा .. हे सर्व भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दिसून आले. सिडनी टेस्टच्या (Sydney Test) 5व्या दिवशी कोणालाही वाटले नाही की 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया (Team India) अशी उत्कटता दाखवेल आणि जिगरबाज खेळ करून सामना ड्रॉ करेल. सामना अनिर्णित राहिला असल्याने चार सामन्यांची मालिका देखील अद्याप 1-1 अशा बरोबरीत आहे. सिडनी कसोटीला टीम इंडियाच्या जिगरबाज खेळीची क्रिकेट विश्वातून सर्वत्र कौतुक केले जात आहे. एकेवेळी सामन्यात पराभव निश्चित वाटत असताना हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर अश्विनच्या (R Ashwin) जोडीने दुखापतीला मागे टाकत खिंड लढवली आणि अखेरीस मैदान मारलं. विहारी आणि अश्विनने पाचव्या दिवशी संध्याकाळच्या संपूर्ण सत्रात बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाविरुध्द ऐतिहासिक ड्रॉ मिळवला. टीम इंडियाच्या या खेळीचे फक्त देशभरातच नाही शेजारी देश, पाकिस्तानी (Pakistan) जनता देखील मुरीद झाली आहे आणि त्यांनी आपल्या टीमला भारतीय संघाकडून शिकण्याचा सल्लाच देऊन टाकला. (Australia Vs India 4th Test: वीरेंद्र सेहवाग यांची बीसीसीआयला ऑफर; दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागेवर खेळण्याची दर्शवली तयारी)
लक्षात घेण्यासारखे म्हणजे पाकिस्तानी टीमने नुकताच न्यूझीलंड दौरा केला होता ज्यात त्यांना टी-20 आणि दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. किवी टीमने दोन्ही सामन्यात पाकिस्तानी टीमवर वर्चस्व गाजवले आणि एकतर्फी मालिका खिशात घातली. यामुळे, पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींच्या मनात संघाविरुद्ध निराजी आहे आणि टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीतील खेळीने त्यांच्या जखमेवर मीठचं चोळले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित टीम इंडिया सामना ड्रॉ करण्याबद्दल संघाचे कौतुक केले आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व मजबूत संघाविरुद्ध कसे खेळावे हा शिकण्याचा सल्ला दिला. पहा हा व्हिडिओ:
दरम्यान, ऑस्टेलिया आणि टीम इंडियामधील कसोटी मालिकेचा अंतिम सामना ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळला जाईल. 15 जानेवारी, शुक्रवारपासून सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी भारतीय टीमपुढे खेळाडूंच्या दुखापतीची मोठी डोकेदुखी आहे. सिडनी सामना ड्रॉ करण्यास महत्वाची भूमिका बजावलेले अनेक खेळाडू चौथ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.