IND vs AUS ODI 2020 Player Battles: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत 'या' खेळाडूंमधील द्वंद्व असेल मजेदार, चाहत्यांना पाहायला मिळेल पैसावसूल एंटरटेनमेंट

टीम इंडियासमोर यंदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आव्हान अजून कठीण असणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाडूंमधील द्वंद्व या मालिकेला अधिक मनोरंजक बनवतील आणि स्टेडियममध्ये उपस्थित व घरी बसून मालिकेचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचे पैसावसूल एंटरटेनमेंट पाहायला मिळेल.

विराट कोहली, अ‍ॅडम झांपा आणि स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Facebook)

IND vs AUS ODI 2020 Player Battles: इंडियन प्रीमियर लीग 2020च्या हेक्टिक मोसमानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) आव्हानात्मक मालिकेसाठी सज्ज होत आहे. आयपीएल संपुष्टात येताच ऑस्ट्रेलियासाठी रवाना झालेला भारतीय संघ (Indian Team( डाऊन अंडर कसून सराव करत आहे. 2018-19 च्या दौऱ्यावरून प्रेरणा घेत भारतीय संघ दौऱ्याची सुरुवात करेल. टीम इंडियासमोर यंदा ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावरील आव्हान अजून कठीण असणार आहे. मर्यादित ओव्हरचा सलामी फलंदाज रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवेल. रोहितला आयपीएल दरम्यान दुखापत झाल्याने त्याला वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही, मात्र त्याचा सुधारित कसोटी संघात सामील केले आहेत. दुसरीकडे, भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेले स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नरही (David Warner) यंदा मालिकेत आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असतील. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियात विराट कोहली रेकॉर्ड बुकमध्ये घालणार 5 विक्रमांची भर; तेंडुलकर, पॉन्टिंग, ब्रायन लारा यांना पछाडण्याची रन-मशीनला संधी)

27 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाडूंमधील द्वंद्व या मालिकेला अधिक मनोरंजक बनवतील आणि स्टेडियममध्ये उपस्थित व घरी बसून मालिकेचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचे पैसावसूल एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. पाहा वनडे मालिकेसाठी 'या' महत्त्वाच्या खेळाडूंमधील लढत:

1. विराट कोहली-अ‍ॅडम झांपा

ऑस्ट्रेलियाचा लेगी अ‍ॅडम झांपा विराट कोहलीविरुद्ध मर्यादित ओव्हर क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने भारतीय कर्णधाराला आजवर सर्वाधिक सात वेळा बाद करून माघारी धाडलं आहे. झांपाने वनडेमध्ये विराटला 5 तर टी-20 क्रिकेटमध्ये दोनदा माघारी पाठवलं आहे. अशा स्थितीत, झांपाविरुद्ध कोहली आपल्या चुका दुरुस्त करू शकेल की नाही हे आता आगामी मालिकेतच समोर येईल.

2. जसप्रीत बुमराह-स्टिव्ह स्मिथ

बुमराहच्या भिन्नतेमुळे स्मिथच्या ग्रिटची परीक्षा होईल. आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणारा बुमराह ऑस्ट्रेलियन मैदानांवर आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असेल. विशेष म्हणजे, स्मिथ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटयामध्ये बुमराहचा पहिला शिकार होता. दुसरीकडे, भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला स्मिथ यंदा घरच्या मैदानावर भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेद्वारे जबरदस्त पुनरागमन करू इच्छित असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध माजी कर्णधार स्मिथने भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. स्मिथने भारताविरुद्ध 15 सामन्यामध्ये 52.15 च्या सरासरीने आणि 98.26 च्या स्ट्राइक रेटने 690 धावा केल्या आहेत.

3. डेविड वॉर्नर-कुलदीप यादव

आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत, कुलदीपने वॉर्नरला चार वेळा त्याला आउट केले. त्या चारपैकी दोन बाद इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोन वेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी केली दोन्ही वेळा त्याला यशस्वीपणे माघारी धाडलं आहे. विशेष म्हणजे कुलदीपने कसोटी पदार्पणात वॉर्नरला बाद करत पहिली विकेट नोंदवली होती. त्यामुळे, कुलदीप पुन्हा एकदा वॉर्नरविरुद्ध आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवू पाहिलं. दुसरीकडे,वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या सर्वात घातक सलामी फलंदाजांपैकी एक आहे आणि घरच्या मैदानावर खेळताना तो अधिकच घातक ठरेल. त्यामुळे, भारतीय गोलंदाजांपुढे वॉर्नरला बाद करून चांगली सुरुवात करण्याचे आव्हान असेल.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिले दोन वनडे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंड तर तिसरा सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे खेळला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif