SCG वर भारत-ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज, पाहा पुढे काय झालं (Watch Video)
भारतीय संघाचा डाव सुरु असताना 21व्या ओव्हरदरम्यान स्टेडियममध्ये एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियाच्या चाहतीला प्रपोज केलं. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
क्रिकेटपटूंशिवाय क्रिकेट स्टेडियममध्ये काही क्रिकेटप्रेमींना आहेत ज्यांना त्यांचे सुंदर क्षण घालवायला आवडतात. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या दुसर्या वनडे सामन्यात असाच काहीसा सुंदर क्षण चाहत्यांना अनुभवायला मिळाला जेव्हा एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या चाहतीला प्रपोज केलं. भारतीय संघाचा (Indian Cricket Team) डाव सुरु असताना 21व्या ओव्हरदरम्यान स्टेडियममध्ये एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियाच्या चाहतीला प्रपोज केलं. मुलाने गुडघ्यावर बसून रिंगसह या तरुणीला प्रपोज केलं जिने मुलाला मिठी मारली आणि होय मध्ये उत्तर दिले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्या वनडे सामन्यात क्रिकेटचा रंजक सामना सुरु असताना स्टँडमध्ये रोमँटिक साइड-प्लॉट पाहायला मिळाला. (IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलिया Unstoppable! टीम इंडियाचा 51 धावांनी धुव्वा उडवत 2-0 ने मालिका केली काबीज)
cricket.com.auने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल चेहऱ्यावर हास्य दाखवून या जोडप्याचे कौतुक करताना दिसत आहे. पाहा क्रिकेटच्या मैदानावरील मोहक क्षण:
त्याच मैदानावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर मालिकेत दुसऱ्यांदा सर्वाधिक मोठी धावसंख्या नोंदवली. ऑस्ट्रेलियाने 389/4 अशी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात भारताला 338 धावांपर्यंत मजल मारता आली. सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर 51 धावांनी मात करुन यजमान ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे 2 डिसेंबर रोजी खेळला जाईल.