IND vs AUS ODI 2020-21: ‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, डेविड वॉर्नरच्या दुखापतीवर KL Rahul याच्या विधानावर सोशल मीडिया यूजर्सने फलंदाजाची घेतली क्लास
वॉर्नरच्या दुखापतीबद्दल भारतीय फलंदाज केएल राहुल विनोदी भावनेने म्हणाला की, “वॉर्नर जितका वेळ बाहेर असेल, ते भारतीय संघासाठी फायद्याचे ठरेल.” वॉर्नरच्या दुखापतीबद्दल राहुलचे विधान अनेक चाहत्यांना पसंत पडले नाही आणि त्यांनी भारतीय फलंदाजांची क्लास घेतली.
IND vs AUS ODI 2020-21: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. वॉर्नरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) दुसऱ्या वनडे मॅचमध्ये फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. वॉर्नरच्या जागी ऑस्ट्रेलियाने डार्सी शॉर्टच्या (D'Arcy Short) नावाची घोषणा केली आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत वॉर्नरच्या दुखापतीबद्दल भारतीय फलंदाज केएल राहुलला (KL Rahul) आपले विचारण्यात आले ज्यावर राहुल विनोदी भावनेने म्हणाला की, “वॉर्नर जितका वेळ बाहेर असेल, ते भारतीय संघासाठी फायद्याचे ठरेल.” वॉर्नरच्या दुखापतीबद्दल राहुलचे विधान अनेक चाहत्यांना पसंत पडले नाही आणि त्यांनी भारतीय फलंदाजांची क्लास घेतली. वॉर्नरबद्दल राहुलने दिलेल्या टिप्पणीमध्ये खेळ भावना कमी असल्याचेही काहींनी लक्ष वेधले. (IND vs AUS 2020-21: अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुंजारा, अश्विन ऑस्ट्रेलियामध्ये करताहेत बेबी-सिटिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'Keep It Up')
"त्याची दुखापत किती वाईट आहे हे आम्हाला ठाऊक नाही. जर तो बराच काळ जखमी झाला तर बरे होईल. त्यांचा एक मुख्य फलंदाज. कोणासाठीही असे बोलणे चांगले नाही पण जर त्याच्या दुखापतीस बराच वेळ लागला तर आमच्या संघासाठी हे चांगले आहे," राहुलने व्हर्च्युअल प्रेसरमध्ये म्हटले. केएल राहुलच्या टिप्पणीवर ट्विटर यूजर्सने कशी प्रतिक्रिया दिली ते पाहा...
चाहते नाखूष
खेळ भावना कुठे आहे?
अजून टीका
चाहत्यांनी राहुलला फटकारले
राहुलवर प्रश्न
सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत वॉर्नरने शानदार कामगिरी केलं आणि त्याने ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यास मदत करत महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली. वॉर्नरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 69 धावा आणि रविवारी झालेल्या दुसर्या वनडे सामन्यात 83 धावा केल्या. येत्या 08 डिसेंबरपासून सुरू होणार्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी वॉर्नरची दुखापत यजमान संघासाठी मोठा धक्का आहे. पण, 17 डिसेंबरपासून बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी सलामी फलंदाज संपूर्ण फिट होऊन परतू शकेल अशी आशा ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे.