IND vs AUS 2020-21: अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुंजारा, अश्विन ऑस्ट्रेलियामध्ये करताहेत बेबी-सिटिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'Keep It Up'
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुंजारा, अश्विन ऑस्ट्रेलियामध्ये करताहेत बेबी-सिटिंग (Photo Credit: Instatram)

IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी (Border-Gavaskar Trophy) कसोटीतज्ज्ञ त्रिकुटाने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी बेबी-सिटिंगचा भरपूर आनंद लुटला. मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) वनडे मालिकेत विजयी आघाडी मिळवली असल्याने डाऊन अंडर टीम इंडियावर सलग तीन पराभवाची तलवार लटकत आहे. मर्यादित ओव्हरचा भारतीय संघ (Indian Team) व्हाईटवॉश रोखण्यासाठी आणि टी-20 मालिकेत आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी उत्सुक असताना कसोटी तज्ज्ञही डाऊन अंडर बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2020-21 जोरदार तयारी करीत आहे. टीम इंडियाने वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळली असून त्यांना क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. म्हणूनच रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या कसोटी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या फॉर्मबद्दल उत्सुकता दर्शविली आहे. (नताशा स्टेनकोविक ने मुलगा अगस्त्य सोबत केला भन्नाट डान्स; पहा हार्दिक पांड्या चा मुलाचा नवा व्हिडिओ)

कसोटी मालिकेपूर्वी अश्विन, रहाणे आणि पुजारा डाऊन अंडर आपापल्या कुटुंबांसमवेत मिळालेल्या वेळेचा चांगला सदुपयोग करून घेत आहेत. टीम इंडियाच्या या तीन टेस्ट स्पेशलिस्ट खेळाडूंच्या पत्नींनी एक दिवसाचा डे-ऑफ घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलींची जबाबदारी आपल्या पतींवर सोपावली. ऑफ स्पिनर अश्विन आणि रहाणे यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली असून तिन्ही खेळाडू वडिलांचे कर्तव्य बजावत असल्याचे दिसत आहे. अश्विनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर तिघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, "मुलांसह फादर्स डे आउट" तर रहाणेने लिहिले, "आशा आहे की आपण आपला डे-ऑफ आनंद घेत असाल (राधिका, प्रीती, पूजा) आपण आमच्यासाठी काय खरेदी करता हे पाहण्यासाठी उत्सुक."

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwin (@rashwin99)

रहाणेची पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

शिवाय, काही दिवसांपूर्वी रहाणेने डे-ऑफ दरम्यान आपल्या हॉटेलच्या खोलीत बॅटिंगचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. पुजाराने देखील आपला वर्कआउट सेशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता ज्यात अश्विन फलंदाजाची नक्कल करताना दिसला होता. म्हणूनच 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया टेस्ट मॅच तज्ज्ञ मैदानाबाहेर चांगला वेळ घालवत आहेत हे म्हणणे सुरक्षित असेल. 2018-19 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या आवृत्तीत विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला होता.