नताशा स्टेनकोविक ने मुलगा अगस्त्य सोबत केला भन्नाट डान्स; पहा हार्दिक पांड्या चा मुलाचा नवा व्हिडिओ
भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते सातत्याने फोटोज, व्हिडिओज शेअर करत असतात. नताशा तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहते.
भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते सातत्याने फोटोज, व्हिडिओज शेअर करत असतात. नताशा तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहते. अलिकडेच नताशाने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओत नताशा मुलगा अगस्त्य (Agastya) सोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या वॉस सिनेमातील जय जय शिव शंकर या गाण्यावर मायलेक डान्स करताना दिसत आहेत. यात नताशाने पॅंट आणि ऑफ शॉडर फ्लोरल प्रिंटचा टॉप घातला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. (Hardik Pandya 27th Birthday: हार्दिक पांड्याच्या 27व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी नताशा स्टॅनकोविच हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' खास फोटो)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
नताशा आणि हार्दिक पांड्या यांना जून महिन्यात पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज नताशा आणि हार्दिक शेअर करत असतात. नताशा मॉडेल असून तिने ‘सत्याग्रह’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु असून त्यात 2 सामने भारताने गमावले आहेत. त्यामुळे मालिका भारताच्या हातातून सुटली असली तरी शेवटच्या सामन्यात विजय मिळवून इंडियन टीम व्हाईट वॉश टाळू शकते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2020 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

