Hardik Pandya 27th Birthday: हार्दिक पांड्याच्या 27व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी नताशा स्टॅनकोविच हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' खास फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिडाविश्वातून हार्दिक पांड्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिडाविश्वातून हार्दिक पांड्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यातच हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) हिनेदेखील आपल्या इंन्स्टाग्राम (Instagram) अकांऊटवर एक सुंदर फोटो पोस्ट करत आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये नताशाने हार्दिकला आपला सर्वात चांगला मित्र आणि प्रेम असल्याचे म्हटले आहे. नताशाने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
दरम्यान, नाताशाने आपल्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या यांच्यासोबत काढलेले अनेक फोटो तसेच त्यांचा मुलगा अगस्त सोबत एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नताशाने लिहले आहे की, माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यामुळे माझ्या जीवनात सुख आणि आनंदाची भरभराट झाली. आपण सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी आभारी आहे. मी तू परत येण्याची आणि अगस्त्यसोबत वेळ घालवण्यासाठी अधिक वाट पाहू शकत नाही. कारण, तो तुझी अधिक आठवण काढत आहे. तू सर्वात चांगला आहे. आमचे तुझ्यावर प्रेम आहे. जगातील प्रत्येक आनंदाचा तू हक्कदार आहेस, अशी पोस्ट तिने केली आहे. हे देखील वाचा- KXIP vs KKR, IPL 2020: हा तर सावळा गोंधळ! KKRच्या नितीश राणाचा रनआऊट पाहून तुम्ही देखील माराल कपाळाला हात (Watch Video)
नताशा इन्स्टाग्राम पोस्ट-
इंडियन प्रीमिअर लीगमुळे हार्दिक पांड्या सध्या यूएईमध्ये आहे. नताशाच्या पोस्टला हार्दिक पांड्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हा सर्वांना आपले प्रेम. माझ्या जीवनात योगदान दिल्याबद्दल धन्यावाद. नताशाने हार्दिकसोबत अनेक फोटो शेअर केली आहेत. एका फोटोत दोघेजण दुबईत जहाजावर दिसत आहेत. जिथे हार्दिकने नताशाला प्रपोज केला होता. दुसऱ्या फोटोत हार्दिक नताशाच्या बेबी बंपचा चुंबन घेत आहेत आणि तिसऱ्या फोटोत हार्दिक नाताशाचा बेबी बम्प पकडताना दिसत आहेत. तर, चौथ्या आणि पाचव्या फोटोमध्ये हार्दिक पांड्या आपला मुलगा अगस्त्याबरोबर पोज करताना दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2020 07:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

