IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: ऑस्ट्रेलिया संघाला 353 धावांचं लक्ष्य

भारतीय फलंदांजांमध्ये रोहित शर्मा 57, विराट कोहली 82 धावांवर आऊट झाला आहे तर शिखर धवनने 117 धावांची खेळी केली आहे.

IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019 (Photo Credits: Getty Images)

दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर आज वर्ल्ड कप 2019 मध्ये  टीम इंडियाची आज लढत ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.  लंडनच्या (London) ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या रोमांचक सामन्याला सुरूवात झाली आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) शतकी खेळीमुळे भारतीय संघ मजबुत स्थितीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने 253 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय संघाने 50 ओव्हर्समध्ये 252 धावा करत 5 विकेट्स गमावल्या आहेत.  रोहित शर्मा याने मोडला सचिन तेंडुलकर याचा 'हा' विक्रम 

भारतीय फलंदांजांमध्ये रोहित शर्मा 57, विराट कोहली 82 धावांवर आऊट झाला आहे तर शिखर धवनने 117 धावांची खेळी केली आहे.विश्वचषक सामन्यांमधील शिखरचं हे तिसरं शतक आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कर्जबुडव्या 'विजय मल्ल्या'ची  उपस्थिती

भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदारांपैकी एक असणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाला रोखणं हे भारतीय गोलंदाजांसमोरिल आव्हान असेल.