IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: रोहित शर्मा याने मोडला सचिन तेंडुलकर याचा 'हा' विक्रम

आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या सुरुवातीलाच हिटमॅन रोहित शर्माने एक विक्रम रचला.

Rohit Sharma (Photo Credits: Getty Images)

आज लंडनच्या (London) ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) सामना रंगत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. या सामन्याच्या सुरुवातीलाच हिटमॅन रोहित शर्माने एक विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात 2000 धावा करणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला होता. त्यानंतर या यादीत वेस्टइंडिजच्या विवियन रिचर्ड्स आणि डेस्मंड यांचीही नावे आहेत.

मात्र रोहित शर्माने या तिघांचाही विक्रम मोडत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद 2000 धावा करणारा क्रिकेटर ठरला आहे. रोहित शर्माने हा विक्रम 37 सामन्यात केला तर सचिनला हा विक्रम करण्यासाठी 51 सामने खेळावे लागले होते. तर वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स आणि डेस्मंड यांनी अनुक्रमे 45 आणि 59 सामन्यात हा विक्रम केला होता. (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

रोहित शर्माने वर्ल्डकपची सुरुवात दमदार केली आहे. दक्षिण ऑफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक करत त्याने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now