IND vs AUS: पहिल्या टी-20 पूर्वी टीम इंडिया खेळाडूंची आऊटींग! हार्दिक पांड्या, विराट कोहलीने घेतला ‘Beautiful Sunny Canberra’ चा आनंद, पाहा Photo

मनुका ओव्हलच्या खेळपट्टीवर कोण बाजी मारणार हे आता काही तासांतच स्पष्ट होईल, पण त्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. पहिल्या टी-20 सामन्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच संघाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर विराट कोहली, केएल राहुल आणि मयंक अग्रवालसोबत कॅनबेरामध्ये सकाळी आउटिंग करतानाचा फोटो शेअर केला.

IND vs AUS: पहिल्या टी-20 पूर्वी टीम इंडिया खेळाडूंची आऊटींग! हार्दिक पांड्या, विराट कोहलीने घेतला ‘Beautiful Sunny Canberra’ चा आनंद, पाहा Photo
हार्दिक पांड्या साथीदारांसह (Image Credit: Instagram)

IND vs AUS T20I: एकदिवसीय सामन्यात 2-1ने पराभूत झाल्यानंतर आता टी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला (Australia) टक्कर देण्याच्या उद्देशाने टीम इंडिया (Team India) आज मैदानावर उतरेल. एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरी पण टी-20 सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) वरचष्मा आहे. कॅनबेराच्या मनुका ओव्हलच्या खेळपट्टीवर कोण बाजी मारणार हे आता काही तासांतच स्पष्ट होईल, पण त्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. पहिल्या टी-20 सामन्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच संघाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) इंस्टाग्रामवर विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालसोबत (Mayank Agarwal) कॅनबेरामध्ये (Canberra) सकाळी आउटिंग करतानाचा फोटो शेअर केला. हार्दिकने कॅनबेरामधील एका कॅफेमधील सेल्फी पोस्ट केली जात हे सर्व खेळाडू सामन्यापूर्वी निवांत कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे. (IND vs AUS 1st T20I Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती)

हार्दिकने सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘Out and about beautiful sunny Canberra’ असं लिहिलं आहे. हार्दिकने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया डाऊन अंडर विरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये शानदार कामगिरी बजावली. 90, 28 आणि नाबाद 92 धावा करून त्याने सहाव्या क्रमांकावर आपले स्थान बळकट केले आणि एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून मालिका खेळत त्याने मोठे योगदान दिले. तर हार्दिकने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार ओव्हर गोलंदाजी केली आणि शतकवीर स्टीव्ह स्मिथला माघारी धाडलं. इतकंच नाही तर तिसऱ्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजासोबत 150 धावांची भागीदारी संघाची धावसंख्या तीनशे पार नेली. तुम्हीही पाहा हार्दिकचा हा सेल्फी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

यजमान ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियामधील पहिला टी-20 सामना कॅनबेरा तर पुढील दोन सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळले जातील. त्यामुळे निराशाजनक वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला विजयाची गती कायम ठेवायची आणि टी-20 च्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवून आघाडीच्या घेण्याच्या निर्धारित असतील.

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2020 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).