IND vs AUS Boxing Day Test: मेलबोर्न येथे 'या' टीम इंडिया फलंदाजाने केली होता धमाल, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज झाले होते बेहाल (Watch Video)

सेहवागचा तो पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. मेलबर्नच्या मैदानावर खेळत सेहवागने तुफान डाव खेळत शतक ठोकले, पण अवघ्या पाच धावांनी दुहेरी शतक हुकले.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2003-04 (Photo Credit: YouTube)

IND vs AUS Boxing Day Test: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) चार सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला अवघ्या काही तासांतच सुरुवात होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळल्या जाणाऱ्या या पारंपरिक सामन्याची दोन्ही संघातील क्रिकेट चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. हा सामना दोन्ही संघातील खेळाडूंसाठी खास असेल कारण दोन्ही देशांतील हा 100वा टेस्ट सामना असणार आहे. अ‍ॅडिलेड ओव्हल येथील मालिकेतील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय टीम जबरदस्त पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल. याच मैदानावर एका भारतीय फलंदाजाने पहिल्यांदा खेळत बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली आणि 195 धावा फाटकावल्या आणि तो म्हणजे सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag). (IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग डे टेस्टसाठी भारताचा Playing XI जाहीर, पहा कोण इन कोण आऊट)

2001 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या सेहवागचा तो पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. मेलबर्नच्या मैदानावर खेळत सेहवागने तुफान डाव खेळत शतक ठोकले, पण अवघ्या पाच धावांनी दुहेरी शतक हुकले. 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 4 टेस्ट सामन्यांच्या तिसऱ्या मॅचमध्ये सेहवागने 233 चेंडूत 25 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार खेचत 195 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला केला होता. सेहवागने पहिल्या डावात 195 धावा केल्या मात्र दुसऱ्या डावात तो फक्त 11 धावाच करू शकला. भारताने हा सामना 9 विकेटने गमावला असला तरी सेहवागची खेळी त्याच्या सर्वोत्तम डावांपैकी एक होती. सेहवागला वगळता ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने दुहेरी शतक ठोकत 257 धावा केल्या होत्या. पॉन्टिंगने 458 चेंडूंच्या आपल्या डावात 25 चौकार मारले होते.

दरम्यान, 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपले प्लेइंग इलेव्हन घोषित केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यातील विजयी संयोजनात कोणताही बदल झाला नाही तर भारतीय इलेव्हनमध्ये शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिरीजचा समावेश झाला तर पृथ्वी शॉ आणि रिद्धिमान साहा यांना बेंचवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी सिराजला पदार्पणाची संधी मिळाली आहे. शुभमन गिल देखील मेलबर्नमध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी डेब्यूसाठी सज्ज आहे.