IND vs AUS 4th Test Day 5 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ब्रिस्बेन टेस्ट लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती

टिम पेनचा कांगारू संघ आणि अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियामधील ब्रिस्बेन टेस्ट आता रोमांचक वळणावर येऊन पोहचला आहे. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test Day 5 Live Streaming: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील गब्बा येथे कसोटी मालिकेच्या अंतिम दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. टिम पेनचा (Tim Paine) कांगारू संघ आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियामधील (Team India) ब्रिस्बेन टेस्ट आता रंगतदार स्थितीत येऊन पोहचला आहे. चौथ्या दिवसाचे अंतिम सत्र पावसामुळे वाया गेल्यामुळे आता अंतिम दिवसाचा खेळ अर्धातास लवकर सुरु होईल. गब्बा (Gabba) स्टेडियमवर पाचव्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता सुरु होईल. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (Brisbane Weather for January 19: ब्रिस्बेन टेस्ट सामन्याला पाचव्या दिवशीही बसणार पावसाचा फटका? असा आहे हवामानाचा अंदाज)

कांगारू संघाने विजयासाठी दिलेल्या 328 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात पावसाने अढथळा आणण्यापूर्वी बिनबाद 4 धावा केल्या होत्या. संघाचे दोन्ही सलामी फलंदाज-रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर होते. आणि आता संघाला सामन्याच्या अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 324 धावांची गरज आहे तर, यजमान संघाला 10 विकेटची आवश्यकता आहे. आजचा दिवस दोन्ही संघासाठी निर्णायक ठरेल. सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कायम राहील. असे झाल्यास 2016-17 आणि 2018-19 नंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीज जिंकण्याचा पराक्रम करेल.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.