IND vs AUS 4th Test Day 4 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ब्रिस्बेन टेस्ट लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल.
IND vs AUS 4th Test Day 4 Live Streaming: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा मैदानावर आज भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अंतिम टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे सध्या 54 धावांची आघाडी असून चौथ्या दिवशी फलंदाज वेगवान खेळ करून आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात असतील. दुसऱ्या डावात फलंदाजी करत कांगारू संघाला अद्याप एकही झटका बसला नाही आहे, अशा स्थितीत हातात विकेट असल्याने यजमान संघाचे फलंदाज हात मोकळा करून चौथ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियापुढे (Team India) मोठे आव्हान देऊ इच्छित असतील. गब्बा (Gabba) स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता सुरु होईल. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (Rishabh Pant Will Break MS Dhoni's Record: लवकरच ऋषभ पंत मोडणार महेंद्र सिंह धोनीचा 'हा' विक्रम; केवळ एक धावाची गरज)
पहिले फलंदाजी करतात यजमान संघाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला होता. प्रत्युत्तरात टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी 336 धावांपर्यंत मजल मारली आणि कांगारू संघाला फक्त 33 धावांची आघाडी घेण्यास भाग पडले. नवख्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला व संघाची धावसंख्या तीनशे पार नेली. दोंघांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आणि संघाचे आव्हान कायम ठेवले. आता दुसऱ्या डावात टीम इंडिया गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे त्यांच्यापुढे खडतर आव्हान असणार आहे.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.