IND vs AUS: शुभमन गिलची शतकी, कोहलीचे अर्धशतकी खेळ, तिसऱ्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाचे वर्चस्व
त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावले. ऑफस्पिनर नॅथन लियॉनने गिलला बाद केले.
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळी करत तीन विकेट्सच्या नुकसानावर 289 धावा केल्या. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने सकाळच्या सत्रात शानदार खेळी करत आपले कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक साजरे केले . त्याला पहिले चेतेश्वर पुजाराने (42) चांगली साथ दिली तर नंतर विराट कोहलीने देखील चांगली साथ दिली. 128 धावांकरुन शुभमन बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया अजूनही 191 धावांनी पिछाडीवर आहे. (IND vs AUS: शुभमन गिलचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दमदार शतक)
रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले असून या दोघांवर चौथ्या दिवशी भारताला चांगल्या स्थितीत आणण्याचे काम असून सध्या हा सामना अर्निनित अवस्थेकडे चालला असल्याचे दिसत आहे. आज ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्हेनमन यांनी तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली बाकी कोणालाही यश मिळाले नाही.भारतीय कर्णधार रोहित शर्माला आज मोठी खेळी करता आली नाही. एक खराब फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. रोहित शर्मा 35 धावांवर बाद झाला.
सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतकी खेळी खेळली. शुभमन गिलने 235 चेंडूत 128 धावांची शानदार खेळी केली. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावले. ऑफस्पिनर नॅथन लियॉनने गिलला बाद केले. शुभमन गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून भारतातील पहिलेच शतक आहे. विराट कोहलीने देखील अर्धशतक झळकावले. कोहलीने तब्बल 14 महिन्यानंतर अर्धशतकी खेळी साकारली. जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात त्याने या आधी अर्धशतकी खेळी साकारली होती.