IND vs AUS 4th Test Day 3: ब्रिस्बेन कसोटीत भारत बॅटफुटवर, चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे आऊट; ऑस्ट्रेलियाच्या अद्याप 208 धावांनी पिछाडी
दिवसाच्या पहिल्या सत्रात कांगारू संघाने टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले आणि टीम इंडियाने दुपारच्या जेवणापर्यंत 4 विकेट गमावून 60 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या आहेत. संघ यजमान संघाच्या अद्याप 208 धावांनी पिछाडीवर आहे.
IND vs AUS 4th Test Day 3: गब्बा (Gabba) मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात कांगारू संघाने टीम इंडियाला (Team India) दोन मोठे धक्के दिले आणि पायधरुन फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) व कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) माघारी धाडलं. पुजारा 25 तर रहाणेने 37 धावा केल्या. यजमान संघाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुपारच्या जेवणापर्यंत 4 विकेट गमावून 60 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या आहेत. संघ यजमान संघाच्या अद्याप 208 धावांनी पिछाडीवर आहे. आता संघाची मदार मयंक अग्रवाल आणि रिषभ पंत यांच्यावर आहे. लंचची घोषणा झाली तेव्हा मयंक 38 धावा तर पंत 4धावा करून खेळत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर दबाव कायम ठेवला आहे. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने संघाला दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. याशिवाय, पहिल्या दिवशी पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनीही अनुक्रमे 1 गडी बाद केला आहे. (IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्टच्या दुसर्या दिवशी केलेल्या या 2 मोठ्या चुका टीम इंडियावर भारी पडत आहे, वाचा सविस्तर)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 2 बाद 92 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. पुजारा आणि रहाणेने दिवसाची सावध सुरुवात करत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. संघाला दोंघांमध्ये मोठ्या भागिदारीची गरज असताना हेझलवूडने पुजाराला स्वस्तात माघारी धाडलं. पुजारा आणि रहाणेमध्ये 45 धावांची भागिदारी झाली. त्यानंतर रहाणेने मयंक अग्रवालच्या साथीने किल्ला लढवण्यास सुरुवात केली. मात्र, भारताने आज सकाळच्या सत्रात दुसरी महत्त्वाची विकेट गमावली. स्टार्कच्या चेंडूवर कर्णधार रहाणे 37 धावांवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मार्नस लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर कांगारू संघाने 369 धावा केल्या. शिवाय, दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारतीय संघ अंतिम सत्रात खेळू शकला नाही. दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 26 ओव्हरयामध्ये 2 विकेट गमावून 62 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि रोहित शर्मा पहिल्या दिवशी माघारी परतले. शुभमनने 7 धावा केल्या आणि रोहितचे अर्धशतक थोडक्यात हुकले. रोहित 44 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.
यापूर्वी पहिल्या डावात यजमान संघासाठी लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांचा शतकी डाव खेळला तर कर्णधार टिम पेनने 50 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन 47 धावा, मॅथ्यू वेड 45 आणि स्टिव्ह स्मिथने 36 धावांचे योगदान दिले.