IND vs AUS 4th Test Day 1: मार्नस लाबूशेनचे अर्धशतक, दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 154 धावा

भारताविरुद्ध टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करत चहाच्या वेळेपर्यंत 3 विकेट गमावून 154 धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन आणि मॅथ्यू वेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली आहे.

मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty)

IND vs AUS 4th Test Day 1: ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताविरुद्ध टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करत चहाच्या वेळेपर्यंत 3 विकेट गमावून 154 धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन आणि मॅथ्यू वेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली आहे. तसेच अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लाबूशेनने भारतीय गोलंदाजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसऱ्या सत्राखेर लाबूशेन नाबाद 70 धावा तर वेड नाबाद 27 धावांवर खेळत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथ्या आणि अखेरच्या टेस्ट मॅचला आज, 15 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या सत्रात वॉशिंग्टन सुंदरने एकमात्र स्टिव्ह स्मिथची विकेट मिळवून देत संघाला मोठा दिलासा दिला. अशाप्रकारे, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि सुंदरला अद्याप प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. (IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुदंरने पहिली टेस्ट विकेट म्हणून स्टिव्ह स्मिथला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, रोहित शर्माने पकडला जबरदस्त कॅच, पहा Video)

पहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघाकडून डेविड वॉर्नरने नवीन सलामी जोडीदार मार्कस हॅरिससह डावाची सुरूवात केली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सिराजने पहिल्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर यजमान संघाला मोठा धक्का दिला. सिराजने पहिल्याच षटकात सलामीवीर वॉर्नरला स्लिपमध्ये अवघ्या 1 धावेवर माघारी धाडलं. त्यानंतर 9व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरने मॉर्कस हॅरिसची शिकार केली. त्यानंतर संघ बॅकफूटवर असताना स्मिथ आणि मार्नस लाबूशेन या दोघांनी सावरला.दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली असताना ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू सुंदरच्या गोलंदाजीवर आक्रमक स्मिथ रोहित शर्माकडे झेलबाद होऊन बाद झाला. स्मिथ सुंदरचा पहिला कसोटी शिकार ठरला. अखेर लाबूशेन आणि वेड यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने धावफलक हलता ठेवला.

गब्बा कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले तर कांगारू संघाने दुखापतग्रस्त विल पुकोवस्कीच्या जागी मार्कस हॅरिसचा समावेश केला. हॅरिस पहिल्या डावात उठावदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला.