IND vs AUS 4th Test Day 1: टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीनंतर लाबूशेन-स्मिथची संयमी खेळी, ब्रिस्बेन टेस्टमध्ये लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 65/2

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या आणि अंतिम टेस्ट सामन्याला ब्रिस्बेनच्या गब्बा येथे सुरुवात झाली आहे. कांगारू संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत दिवसाच्या पहिल्या पहिल्या सत्रात 27 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 65 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापूर्वी टीम इंडियाने यजमान संघाच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आणि विरोधी संघावर दबदबा निर्माण केला.

IND vs AUS 4th Test Day 1: टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीनंतर लाबूशेन-स्मिथची संयमी खेळी, ब्रिस्बेन टेस्टमध्ये लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 65/2
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test Day 1: भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील चौथ्या आणि अंतिम टेस्ट सामन्याला ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे सुरुवात झाली आहे. कांगारू संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत दिवसाच्या पहिल्या पहिल्या सत्रात 27 ओव्हरमध्ये  2 विकेट गमावून 65 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापूर्वी टीम इंडियाने यजमान संघाच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आणि विरोधी संघावर दबदबा निर्माण केला, पण पहिल्या दोन झटक्यानंतर लाबूशेन आणि स्मिथने संयमी डाव खेळत लंचपर्यंत संघाला आणखी एक धक्का लागू दिला नाही. डेविड वॉर्नर 1 तर मार्कस हॅरिस 5 धाव करून माघारी परतले. लंचची घोषणा झाली तेव्हा टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या यजमान संघाकडून मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) नाबाद 19 धावा आणि सिडनी कसोटीतील शतकवीर स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) नाबाद 30 धावा करून खेळत होते. भारताकडून पहिल्या सत्रात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 4th Test 2021: रोहित शर्माने अफलातून कॅच घेत डेविड वॉर्नरला धाडलं तंबूत, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त Watch Video)

दुखापतग्रस्त विल पुकोवस्कीच्या जागी गब्बा कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने हॅरिसचा समावेश केला आहे. हॅरिस आणि वॉर्नरची नवी सलामी जोडी कांगारू संघासाठी मैदानावर उतरली, मात्र वॉर्नर पुन्हा एकदा अपयशी ठरला. मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये वॉर्नरला स्लिपमध्ये रोहित शर्माकडे स्लिपमध्ये कॅच आऊट करत विरोधी संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. त्यानंतर, सावध फलंदाजी करणाऱ्या हॅरिसला ठाकूरने पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. शार्दूलने हॅरिसला ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरकडे झेलबाद करत माघारी धाडलं. हॅरिस अवघ्या 5 धावा काढून बाद झाला. हॅरिस शार्दूलला पहिला कसोटी शिकार ठरला.

दरम्यान, ब्रिस्बेन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडले आहेत. भारतासाठी टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरने आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे नटराजनने यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मध्ये देखील पदार्पण केले होते. नटराजनला नेट गोलंदाज म्हणून डाऊन अंडर दौऱ्यावर नेण्यात आले होते, मात्र खेळाडूंच्या दुखापतींमुळे अखेर त्याला संघात स्थान देण्यात आलं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us