IND vs AUS 4th Test 2021: अजिंक्य रहाणेला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मिळाले दोन जीवदान पण नंतर गमावली विकेट, पाहून तुम्हीही म्हणाल किती हे दुर्दैव! (Watch Video)
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने टीम इंडिया कर्णधार अजिंक्य रहाणेला बाहेरच्या बाजूला चेंडूने त्रास देत होता. पण, रहाणेच्या विकेटने दुपारच्या जेवणापूर्वी यजमान संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी मोठे यश मिळाले.
IND vs AUS 4th Test 2021: भारताविरुद्ध (India) मागील काही कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करूनही मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) तिसर्या दिवशीच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने टीम इंडिया कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बाहेरच्या बाजूला चेंडूने त्रास देत होता आणि दोनदा त्याच्या बॅटच्या कडेला चेंडू लागून मागे उभ्या फिल्डरच्या हाती न जात चेंडूने सीमारेषा ओलांडली. यामुळे स्टार्कची डोकेदुखी आणखी वाढली. पण, स्टार्कच्या तशाच चेंडूवर रहाणे फसला आणि तंबूत परतला. रहाणेच्या विकेटने दुपारच्या जेवणापूर्वी यजमान संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Bordar-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी मोठे यश मिळाले. या रहाणेचं दुर्दैवच म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण तसेच दोन चेंडू सीमारेषे पार गेल्यामुळे रहाणेला दोन जीवदान मिळाले. रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने 45 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला, पण पुजाराला स्वस्तात माघारी धाडलं. (IND vs AUS 4th Test Day 3: ब्रिस्बेन कसोटीत भारत बॅटफुटवर, चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे आऊट; ऑस्ट्रेलियाच्या अद्याप 208 धावांनी पिछाडी)
त्यापूर्वी, स्टार्कने टाकलेला चेंडू रहाणेच्या बॅटच्या कडेला लागून गल्लीच्या दिशेने मात्र तिथे खेळाडू नसल्याने भारतीय कर्णधाराला चौकार मिळाली. पण, नशिबाने तिसऱ्यांदा रहाणेला साथ दिली नाही आणि 55व्या ओव्हरच्या स्टार्कच्या अखेरच्या चेंडूवर मॅथ्यू वेडने कॅच घेत अजिंक्यला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. आपण बाद झालेलो पाहून स्वतः रहाणे देखील निराश झाला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापूर्वी रहाणे 93 चेंडूत 3 चौकार खेचत 37 धावांवर बाद होऊन माघारी परतला. अशाप्रकारे दुपारच्या जेवणापर्यंत संघाने 161 धावांवर 4 विकेट गमावल्या. पहा रहाणेची विकेट:
यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावांचा डोंगर उभारला, तर भारतासाठी पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरनेही तीन विकेट्स घेतल्या, तर सिराजने एक विकेट मिळाली. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि द गाब्बा येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारत विजयी किंवा सामना अनिर्णीत राहिल्यास ट्रॉफी कायम राखेल.