IND vs AUS 4th Test 2021: गब्बा मैदानावर चार भारतीय खेळाडूंचा राहीला दबदबा, 'या' टीम इंडिया कर्णधाराने ठोकले सर्वात लोकप्रिय शतक
भारतीय संघ खेळाडूंच्या दुखापतींना मागे टाकत मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी कसून तयारी करीत असताना, आपण पाहूया असे 5 भारतीय खेळाडू ज्यांनी आपल्या फलंदाजीने गब्बा येथे वर्चस्व गाजवले आहे.
IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) संघात 15 जानेवारीपासून बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) मालिकेचा अंतिम टेस्ट सामना ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) स्टेडियमवर सुरु होणार आहे. दौऱ्यावरील अंतिम सामना असल्यामुळे भारतीय संघ (Indian Team) दौऱ्याचा शेवट हा सामना जिंकून मालिका विजयासह गोड करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. दुसरीकडे, कांगारू संघ घरच्या मालिकेत विजय मिळवण्याचा आणि ब्रिस्बेन टेस्टमधील विजयाची साखळी अखंडीत राखण्याच्या निर्धारित असेल. गब्बा येथे विजय मिळवायचा असेल तर भारताला इतिहासाकडे दुर्लक्ष करावे लागणार आहे. कांगारू संघाने 1988 पासून या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. गब्बा येथे टीम इंडियाने सहा कसोटी सामने खेळले आहेत, ज्यातील पाच गमावले तर एक सामना अनिर्णित राहिला. (Wriddhiman Saha vs Rishabh Pant: ब्रिस्बेन टेस्टसाठी रिद्धिमान साहा व रिषभ पंतचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश गरजेचा, जाणून घ्या कारण)
भारतीय संघ खेळाडूंच्या दुखापतींना मागे टाकत मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी कसून तयारी करीत असताना, आपण पाहूया असे 5 भारतीय खेळाडू ज्यांनी आपल्या फलंदाजीने गब्बा येथे वर्चस्व गाजवले आहे.
1. सुनील गावस्कर 113 (डिसेंबर 1977)
लिटिल मास्टर गावस्कर यांच्या दुसऱ्या डावातील शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या जवळ पोहचला होता. कांगारू संघाने विजयासाठी भारतापुढे 341 धावांचे लक्ष्य दिले होते. धावांचा पाठलाग करताना संघ एका टोकाला विकेट गमावत असताना गावसकर यांनी खिंड लढवली. खेळपट्टीवर 320 मिनिटं फलंदाजी करत त्यांनी 264 चेंडूंचा सामना केला आणि 113 लुटल्या. या संयमी खेळी त्यांनी 12 चौकार ठोकले आणि ऑस्ट्रेलियाला या मैदानावर पराभवाची चिंता सतावू लागली. मात्र, अखेरीस वेन क्लार्क यांनी गावस्कर यांचा डाव संपुष्टात आणला. गावस्कर बाद झाल्यावर टीमची स्थिती 243/6 अशी झाली होती आणि विजयासाठी फक्त 100 धावांची गरज होती. तथापि, सय्यद किरमानी यांच्या 55 आणि कर्णधार बिशन सिंह बेदीच्या नाबाद 26 धावांच्या खेळीनंतरही टीमचा डाव 324 धावांवर गुंडाळला आणि त्यांना 16 धावांनी पराभव पत्करावा लागला.
2. सौरव गांगुली 144 (डिसेंबर 2003)
नि: संशयपणे, हे गाब्बा येथे भारतीय खेळाडूने सर्वात प्रसिद्ध शतकांपैकी एक आहे. 2003-04 मध्ये सौरव गांगुलीचा संघ ऑस्ट्रेलियाला स्पर्धा देईल असे कोणालाच वाटले नवहते. गांगुलीने मात्र कर्णधारपदाच्या जोरावर खऱ्या अर्थाने भारताच्या मालिकेतील दिशा निर्धारित केली आणि कॅप्टन्स इंनिंग खेळली. कांगारू संघाचा पहिला डाव 323 धवनवर संपुष्टात आला आणि प्रत्युत्तरात भारतालाही आव्हान कायम ठेवण्यासाठी चमकदार फलंदाजी करण्याची गरज होती. आकाश चोपडा आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या अर्धशतकी भागीदारीनंतर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाल्यावर संघाची स्थिती 3 बाद 62 धावा अशी झाली. गांगुलीने मात्र पुढाकार घेतला आणि टॉप-ऑर्डरवरील सर्वोत्तम डाव खेळला. भारतीय कर्णधार कांगारू आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होता आणि त्याने196 चेंडूत 144 धावा काढल्या.
3. एमएल जयसिम्हा 101 (जानेवारी 1968)
गब्बा येथे चौथ्या डावात भारतीय खेळाडूने झळकावलेले आणखी एक शतक होते. गब्बा जिंकण्यासाठी भारताला 395 धावांची गरज होती. प्रत्युत्तरात संघाने 61 धावांवर 3 विकेट गमावल्या. त्यानंतर रुसी सुरतीच्या 64 आणि कर्णधार मन्सूर अली खान पतौडीच्या 48 धावांनी संघाचा डाव सावरला. तरीही, जयसिम्हाने फलंदाजीला येण्यापूर्वी भारत लक्ष्याच्या जावळही जाईल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. त्याने 291 मिनिटं क्रीझवर कब्जा केला आणि गाब्बा येथे भारताच्या आशा पल्लवित ठेवत नऊ चौकार ठोकले. त्यांनी एक शानदार शतकी धावसंख्या गाठली परंतु 101 धावांवर ते अखेरचे खेळाडू होते. अखेर संपूर्ण संघ 355 धावांवर ऑलआऊट झाला आणि 39 परभावला सामोरे जावे लागले.
4. मुरली विजय 144 (डिसेंबर 2014)
माजी सलामीवीर मुरली विजयने शानदार 144 धावा फटकावत फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजयने ऑस्ट्रेलियाचे घातक मिचेल जॉन्सन, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि शेन वॉटसन अशा गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. 213 चेंडूत 22 चौकार ठोकत विजय क्वचितच कोणत्याही अडचणीत सापडला. त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने बोर्डावर 408 धावांची प्रभावी धावसंख्या उभारली. स्टीव्ह स्मिथचे शतक आणि जॉन्सनच्या 88 धावांनी ऑस्ट्रेलियाला 505 धावांवर पोहचवले आणि विजयची खेळी व्यर्थ ठरली. दुसऱ्या डावात भारताचा फलंदाजी क्रम पत्त्यासारखा कोसळला आणि गब्बा येथे यजमान संघाने चार गडी राखून विजय नोंदवला.
15 जानेवारीपासून गब्बा येथे कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या चार सामन्यांच्या मालिकेत भारत-ऑस्ट्रेलिया 1-1 अशा बरोबरीत आहे. ब्रिस्बेन कसोटी मालिकेचा विजयी संघ निर्धारित करेल.