IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय

या विजयासह टीम इंडियाने 2-1 अशी मालिकाही जिंकली आहे. आणि गब्बाच्या मैदानावर कांगारू संघाचे 32 वर्षापासूनचे अधिराज्य संपुष्टात आणले. ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ही पाच करणं महत्वपूर्ण ठरली.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test 2021: रिषभ पंतच्या (Rishabh Pant) तडाखेदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) रंगतदार चौथ्या ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) सामन्यात ऑस्ट्रेलियावर (Australia) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 अशी मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून (Team India) शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली, तर पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली आणि गब्बाच्या मैदानावर कांगारू संघाचे 32 वर्षापासूनचे अधिराज्य संपुष्टात आणले. ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ही पाच करणं महत्वपूर्ण ठरली. (IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय)

1. वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरची भागीदारी

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात एका वेळी भारतीय संघाचा डाव 250 धावांच्या आत संपुष्टात येईल असे दिसत असताना सुंदर आणि ठाकूर यांच्यातील सातव्या विकेटसाठी 123 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीने भारतीय संघ 336 धावा करण्यास यशस्वी ठरला. ठाकूरने संघासाठी 67 धावांची खेळी केली तर सुंदरने 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

2. चेतेश्वर पुजाराची झुंजार खेळी

पुजाराने दुसर्‍या डावात 211 चेंडूंचा सामना करणार्‍या भारताचा मध्यमगती अनुभवी फलंदाजाने अर्धशतक झळकावत सात चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. या दरम्यान पुजारा एका बाजूने विकेटवर टिकून राहिला, जेणेकरून दुसर्‍या टोकावरील भारतीय फलंदाज उघडपणे खेळू शकले.

3. टीम इंडियाचे दमदार गोलंदाजी

अश्विन, बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी यांच्या दुखापतीमुळे संघाला अंतिम निर्णायक सामन्यात अननुभवी गोलंदाजांचा समावेश करावा लागला. पण त्यांनी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत आपली निवड सार्थ ठरवली. भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी केली. संघासाठी चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरने एकूण 4 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजने सहा, वॉशिंग्टन सुंदरने चार आणि टी नटराजनला तीन विकेट मिळाल्या.

4. शुभमन गिलचा धमाका

भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिलने दुसऱ्या डावात भारताला शानदार सुरुवात करुन देत 146 चेंडूत 91 धावांची अर्धशतकी डाव खेळला. गिलने आपल्या दमदार खेळीत आठ चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार लगावले.

5. रिषभ पंतची वादळी खेळी

अखेरीस टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने ब्रिस्बेनमध्ये 89 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला विजयीरेष ओलांडून दिली. पंतने आपल्या शानदार खेळीच्या वेळी 138 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार व एक षटकार ठोकला. पंतने ज्या कठीण परिस्थितीत टीम इंडियाला विजयाकडे नेले ते खरचं कौतुकास्पद आहे. पंत व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाकडून दुसर्‍या डावात 22 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा कांगारू देशात मालिका जिंकली आहे. यापूर्वी, विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा डाऊन अंडर मालिका जिंकली होती.