IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टमध्ये दोन खेळाडूंचे डेब्यू, पहा सामन्याच्या पहिल्या दिवशी बनलेले प्रमुख रिकॉर्ड

विल पुकोवस्की आणि मार्नस लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी अन्य मोठ्या रेकॉर्डस्ची देखी नोंद झाली जी खालीलप्रमाणे आहेत. 

नवदीप सैनी (Photo Credits: Twitter/BCCI)

IND vs AUS 3rd Test Day 1: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर दोन विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत. संघासाठी युवा सलामीवीर विल पुकोव्हस्की (Will Pucovski) आणि मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) यांनी शानदार अर्धशतक झळकावले. पदार्पणवीर पुकोव्स्कीने 110 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली तर लाबूशेन 149 चेंडूत नाबाद 67 धावा करून परतला. पुकोवस्की आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी अन्य मोठ्या रेकॉर्डस्ची देखी नोंद झाली जी खालीलप्रमाणे आहेत. (IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ, विल पुकोव्हस्की-मार्नस लाबूशेनच्या अर्धशतकाने दिवसाखेर संघाचा स्कोर 166/2)

1. भारताकडून तिसर्‍या कसोटी सामन्यात हरियाणाचा गोलंदाज नवदीप सैनीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यासह, तो देशासाठी कसोटी क्रिकेट सामने खेळणारा 299 वा खेळाडू बनला आहे.

2. सैनी व्यतिरिक्त युवा सलामीवीर विल पुकोव्स्कीने देखील यजमान संघ ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा पुकोस्की हा 460वा खेळाडू ठरला.

3. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर पहिल्या डावात फक्त पाच धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. 6 वर्षांनंतर वॉर्नर दहापेक्षा कमी धावसंख्येवर घरच्या मैदानावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

4. ऑस्ट्रेलियाकडून तिसर्‍या कसोटी सामन्यात वॉर्नरसह युवा सलामीवीर विल पुकोव्स्कीने डावाची सुरुवात केली. कसोटी क्रिकेटमध्ये पुकोवस्की वॉर्नरचा 12वा सलामी जोडीदार ठरला.

5. ऑस्ट्रेलियाकडून पहिला कसोटी सामना खेळताना विल पुकोव्स्कीच्या रूपात सैनीने कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले यश संपादन केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात फलंदाजी करत वॉर्नर आणि पुकोवस्कीच्या रूपात दोन झटके बसले आहेत. वॉर्नरला पाचच्या वैयक्तिक धावांवर सिराजने पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला, तर सैनीला पुकोवस्कीला पायचीत करत माघारी धाडलं. आपल्या पदार्पणाच्या डावात पुकोवस्कीने 62 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif