IND vs AUS 3rd Test 2021: चेतेश्वर पुजाराने ठोकले सर्वात मंद अर्धशतक, रिषभ पंतने दिग्गजांना मागे टाकत ऑस्ट्रेलियामध्ये केली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

पुजारा संधी खेळी करत असताना रिषभ पंतने आक्रमक भूमिकेत फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका विशिष्ट रेकॉर्डची नोंद केली.

चेतेश्वर पुजारी आणि रिषभ पंत (Photo: Facebook)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात भारताचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) तिसऱ्या दिवशी संयमी फलंदाजी करत 173 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यासह टीमची धावसंख्या 190 पार गेली आहे. दुसऱ्या दिवशी भारताच्या दोन्ही सलामी फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये पाठवत कांगारू संघाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात देखील टीम इंडिया (Team India) फलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले. अजिंक्य रहाणे पुजारा यांना धावा करण्यात संघर्ष करावा लागला. प्रभारी कर्णधार रहाणे बाद झाल्यावर पुजारा एकाबाजूने संघर्ष करत लढा देत राहिला. पुजाराला रिषभ पंतने (Rishabh Pant) चांगली साथ दिली. पुजाराचा हा खासगी खेळला गेलेला हळू अर्धशतकी डाव होता. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 मध्ये 173 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. पुजाराचे हे 26वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 8वे अर्धशतक होते. लंचनंतरच्या सत्रात पुजारा 176 चेंडूत 50 धावांवर बाद झाला आणिभारताचा सहावा धक्का बसला. (IND vs AUS 3rd Test 2021: टिम पेनचा राग अनावर! चेतेश्वर पुजारा विरोधात विवादित DRS निर्णयानंतर संतप्त Aussie कॅप्टनने अंपायरवर केला अपशब्दांचा वापर)

पुजारा संधी खेळी करत असताना पंतने आक्रमक भूमिकेत फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. पुजारा आणि पंतमध्ये पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी झाली. पंतने 36 धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका विशिष्ट रेकॉर्डची नोंद केली. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यांत दौऱ्यावर आलेल्या फलंदाजांपैकी पंतने आतापर्यंत सर्वाधिक 25 हुन अधिक धावा केल्या आहेत. पंतने या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दरम्यान क्रिकेटमधील दिग्गज विव्ह रिचर्ड्स, वॅली हॅमंड आणि रुसी सुरती यांना मागे टाकले ज्यांनी सलग 8 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. पंतने आता या सर्वांना पछाडत 9 सरळ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. शिवाय, पंतने केवळ वयाच्या 23व्या वर्षी विक्रमी कामगिरी केली आहे. सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करत पंतने 67 चेंडूत 36 धावांची खेळी केली. पण जोश हेझलवूडच्या चेंडूवर स्लिपमध्ये डेविड वॉर्नरकडे झेलबाद होऊन माघारी परतला.

दुसरीकडे, पुजाराबद्दल बोलायचे झाले तर कमिन्सने या मालिकेच्या पाच डावांत पुजाराला चौथ्यांदा बाद केले आहे. या दरम्यान त्याने 129 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 19 धावा केल्या.