IND vs AUS 3rd Test 2021: दुखापतींच्या चक्रात अडकलेल्या टीम इंडियासाठी खुशखबर, 'हा' स्टार खेळाडू बॅटिंगसाठी सज्ज

त्यानंतर आऊट झाल्यावर पंतला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे पंतला कोणताही फ्रॅक्चर झालेला नाही आणि 5व्या दिवशी फलंदाजी करण्यास तो सक्षम होईल असे स्पष्ट झाले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Rishabh Pant Injury Update: ऑस्ट्रेलियाच्या 2020-21 दौऱ्यावर टीम इंडिया (India Tour of Australia) खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सिडनी टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अंगठ्याला फॅक्चर झाल्यामुळे त्याला आता उर्वरित दोन दिवस आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. जडेजापूर्वी युवा फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हाताला देखील दुखापत झाली ज्याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठा अपडेट दिला आहे. सिडनी (Sydney) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना पंतच्या हातावर पॅट कमिन्सचा (Pat Cummins) घातक चेंडूचा मार बसला. त्यानंतर त्याने काही काळ बॅटिंग केली पण तो फलंदाजी करताना अस्वस्थ दिसला. आऊट झाल्यावर पंतला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे पंतला कोणताही फ्रॅक्चर झालेला नाही आणि 5व्या दिवशी फलंदाजी करण्यास तो सक्षम होईल असे स्पष्ट झाले. सिडनी टेस्ट सामन्याच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा शॉर्ट बॉल लागल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे स्कॅन करण्यात आले. (IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाला मोठा धक्का, रिषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला; रिद्धिमान साहा दुसर्‍या डावात करणार विकेटकीपिंग)

पंत आणि जडेजाच्या दुखापतीवर अपडेट देताना एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने PTI ला सांगितले की, "रवींद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर डिसलोकेट व फ्रॅक्चर झाला आहे. ग्लोव्ह्ज घालणे आणि फलंदाजी करणे त्याला कठीण जाईल. कोणत्याही परिस्थितीत, तो कमीतकमी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत मैदानाबाहेर राहणार आहे ज्यामुळे त्याला अंतिम कसोटीतून बाहेर पडावे लागत आहे. पंत दुखापती तितकी गंभीर नसल्याने फलंदाजी करू शकेल." पंतच्या एल्बोला बॉल लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तो विकेटकिपिंगसाठी मैदानात उतरला नाही आणि त्याच्या जागी आयसीसी नियमांनुसार रिद्धिमान साहाने ग्लोव्हस घातले.

दरम्यान, सिडनी कसोटी सामन्यापूर्वी, टीम इंडियाला खेळाडूंच्या विविध दुखापतींचा सामना करावा लागला होता. इशांत शर्माला दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने त्याची निवड झाली नाही तर अ‍ॅडिलेडमध्ये मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाले, तर मेलबर्न कसोटीत गोलंदाजी करताना उमेश यादवच्या पोटरीच्या स्नायूंवर ताण आल्याने त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर तिसऱ्या टेस्टपूर्वी नेटमध्ये सराव करताना केएल राहुलच्या मनगटाला दुखापत झाल्याने मायदेशी परतावे लागले.