IND vs AUS 3rd Test Pitch Report: भारत-ऑस्ट्रेलिया SCG टेस्टसाठी खेळपट्टी तयार, पहा कोण ठरणार कोणाच्या वरचढ
SCG मध्ये मॅचसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या सिडनी टेस्टसाठी खेळपट्टीही तयार आहे. एससीजीची विकेट पाहता ती फलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल आणि चेंडू बॅटवर चांगला येईल अशी अपेक्षा आहे.
IND vs AUS 3rd Test Pitch Report: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) वार्षिक गुलाबी कसोटीत 7 जानेवारीपासून टक्कर होणार आहे. पहिल्या अॅडिलेड कसोटीच्या (Adelaide Test) दुसर्या डावात अवघ्या 36 धावांवर बाद झाल्यानंतर एमसीजी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेटने एकतर्फी विजय मिळवत टीम इंडियाने (Team India) शानदार कमबॅक केले. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत बोलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली, मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू संघर्ष करताना दिसले. डेविड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्कीच्या संघात सामील होण्याने कांगारू संघाला मोठा दिलासा मिळाला असेल पण अद्याप त्यांची चिंता कमी झालेली विशेषतः स्टिव्ह स्मिथच्या बाबतीत. स्मिथने मागील दोन सामन्यात मिळून 10 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 1-1ने बरोबरी असल्याने दोन्ही संघ चौथ्या कसोटीत आघाडी घेण्यास उत्सुक असतील आणि चाहत्यांना पुन्हा एकदा बॅट व बॉलचा दमदार खेळ पाहण्यासाठी मिळेल. (IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्मासाठी 'या' खेळाडूची होणार टीम इंडियातून एक्झिट, वाचा सविस्तर)
SCG मध्ये मॅचसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या सिडनी टेस्टसाठी खेळपट्टीही तयार आहे. एससीजीची विकेट पाहता ती फलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल आणि चेंडू बॅटवर चांगला येईल अशी अपेक्षा आहे. फिरकी गोलंदाजांना नक्कीच खेळपट्टीवर वळण मिळेल आणि अश्विन व नॅथन लायन यांच्यातील लढाई पाहण्यासारखी असेल. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर काही हालचाल मिळेल, परंतु बॉल जसजशी आपली चमक गमावत जाईल ती कमी होईल. अशा स्थितीत सिडनीची खेळपट्टी टीम इंडिया खेळाडूंना साजेशी दिसत आहे, त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरू शकतो. तसेच फंलदाजांनाही ही खेळपट्टी अनुकूल आहे. या मैदानात 705 ही सर्वाधिक धावसंख्या आहे जी विशेष म्हणजे टीम इंडियानेच 2003-04 च्या दौऱ्यावर केली होती.
मालिका बरोबरी करण्यासाठी भारताने उत्तम कामगिरी बजावली असताना वॉर्नर आणि पुकोव्हस्कीच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या त्यांच्या फलंदाजीत सुधारणा होईल. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आपल्या वाईट कामगीरीला मागे टाकण्यासाठी स्टिव्ह स्मिथ देखील प्रभावी खेळी करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे, मालिकेत हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागन झालं असल्याने टीम इंडियाला मजबूती मिळाली आहे. त्यामुळे, संघ दुसरा विजय मिळविण्यासाठी अधिक सक्षम झाला आहे, पण घरच्या मैदानावर पुन्हा विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मोठा पाठिंबा असेल.