IND vs AUS 3rd Test 2021: Rishabh Pant याला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथने केली चीटिंग, व्हायरल व्हिडिओनंतर यूजर्सने डागले टीकेचे बाण (Watch Video)

ऑस्ट्रेलिया आणि भारतात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. दोन्ही संघातील तिसऱ्या सामन्याची शेवट रोमांचक स्थितीत पोहचली आहे. पहिल्या सत्रातील पेय ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीवर त्याच्या गार्डच्या खुणा पुसून टाकत पंतला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला.

भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी टेस्ट (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतात (India) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. दोन्ही संघातील तिसऱ्या सामन्याची शेवट रोमांचक स्थितीत पोहचली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात 102 धावांवर 3 विकेट गमावल्यावर टीम इंडियाने रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 73 आणि चेतेश्वर पुजाराच्या नाबाद 41 धावांच्या जोरावर लंचपर्यंत 206 धावांपर्यंत मजल मारली आहे. कांगारू संघाने दिलेल्या 407 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंत आणि पुजाराची शतकी भागीदारी महत्वपूर्ण ठरत आहे. पण पहिल्या सत्राच्या पेय ब्रेक दरम्यान अशी एक घटना घडली ज्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले. पंतने हळू सुरुवात केली पण ऑस्ट्रेलियन गोलंदाज, विशेषतः नॅथन लायनला टार्गेट करत क्रीजवर फटकेबाजी सुरु केली. पंतने 64 चेंडूंत पाच चौकार व तीन षटकार खेचत अर्धशतक झळकावलं. पहिल्या सत्रातील पेय ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) खेळपट्टीवर त्याच्या गार्डच्या खुणा पुसून टाकत चीटिंग केली आणि पंतला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. (IND vs AUS 3rd Test Day 5: रिषभ पंतच्या चौफेर फटकेबाजीने SCG टेस्ट रंगतदार स्थितीत, लंचपर्यंत टीम इंडियाची 205 धावांपर्यंत मजल)

पेय ब्रेकनंतर स्मिथ खेळपट्टीवर चालत आला आणि गार्डच्या खुणा सोडल्या व पंतला पुन्हा गार्डला परत घेण्यास भाग पाडले. स्मिथची ही चीटिंग कॅमेरात कैद झाली आणि काही वेळातच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आणि ट्विटरवर यूजर्स स्मिथला धारेवर धरलं. पहा व्हिडिओ

स्मिथच्या कृतीवर यूजर्सने अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली.

चीटर फॉर लाइफ

स्मिथ कोणत्याही स्तरावर जाईल

स्टिव्ह स्मिथ

असे का केले?

बॉल टेम्परिंगचा वापरू शकता....स्मिथ!

दरम्यान, पहिल्या सत्रात पंतच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती ज्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पंतची दुखापत गंभीर नसल्याचे समजल्यावर पंत चौथ्या दिवशी मैदानाबाहेर राहिला आणि आता सामन्याच्या अंतिम दिवशी फलंदाजीला उतरला आहे. सामन्याची स्थिती पहाता पंतला फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाली आणि तो पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला. पुजारा संथ खेळी करत असताना पंतने आक्रमक भूमिका घेतली आणि सिडनीच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी करत संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. पंत आणि पुजारामध्ये लंचपर्यंत 104 धावांची भागीदारी झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now