IND vs AUS 3rd T20I: विराट कोहलीची एकाकी झुंज; टीम इंडियाची क्लीन स्वीपची संधी हुकली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने मिळवला विजय

ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करण्याची संधी भारतीय संघाने गमावली मात्र मालिका 2-1 अशी जिंकली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd T20I: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) पहिले फलंदाजी करत टीम इंडियाला (Team India) दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताला 174 धावांपर्यंतच मजल मारला आली आणि 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा (Australia) त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करण्याची संधी भारतीय संघाने गमावली मात्र मालिका 2-1 अशी जिंकली. कांगारू संघाने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अर्धशतकी खेळी करत सर्वाधिक 85 धावांचा डाव खेळला, पण संघाला विजय मिळवून देण्यास तो पुरेसा ठरला नाही. विराट वगळता शिखर धवनने 28 आणि हार्दिकने 20 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवासह भारताच्या सलग 10 टी-20 सामने जिंकण्याची मालिका संपुष्टात आली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाज बॉलने प्रभावी कामगिरी बजावली. मिचेल स्वीपसनला (Mitchell Swepson) सर्वाधिक 3 तर ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट आणि अँड्र्यू टाय यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 3rd T20I: सुपरमॅनसारखं हवेत उडून संजू सॅमसनने केले चकित करणारे क्षेत्ररक्षण, पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने केएल राहुलला माघारी धाडलं. त्यानंतर धवन आणि विराटने डाव सांभाळला. पण, स्वीपसनने जमलेली जोडी फोडली आणि धवनला डॅनियल सॅम्सकडे सीमारेषेवर झेलबाद केले. यादरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत विराटने अर्धशतकी खेळी केली आणि ऑस्ट्रेलियात 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण गाठला. स्वीपसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन सीमारेषेवर स्मिथकडे झेल देऊन माघारी परतला. श्रेयस अय्यरही शून्यावर माघारी परतला. विराटला दुसऱ्या टोकाकडून प्रभावी साथ मिळाली नाही आणि तो एकटा झुंज देत राहिला.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेडने 80 तर मॅक्सवेलने 54 धावांची खेळी करत टीमला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. कर्णधार आरोन फिंच भोपळाही फोडू शकला नाही. वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर, वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं आणि सिडनी ग्राउंडवर चौफेर फटकेबाजी केली. मॅक्सवेलने आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही मोठे फटके खेळले आणि वेडला साजेशी साथ दिली. वेड आणि मॅक्सवेलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. दुसरीकडे, भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 2 तर टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif