IND vs AUS 3rd T20I: भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' खेळाडूंना संधी

आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले ऑस्ट्रेलियाला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियाकडून नियमित कर्णधार आरोन फिंचचे कमबॅक झाले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टी-20 (Photo Credit: Instagram)

IND vs AUS 3rd T20I: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघ (Indian Team) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचसाठी सज्ज आहेत. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले ऑस्ट्रेलियाला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. टीम इंडियाने यापूर्वी झालेले पहिले दोन्ही टी-20 सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली असल्याने आजच्या सामन्यात त्यांच्या समोर यजमान कांगारूंचा त्यांच्या घरी दुसऱ्यांदा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे, तर ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असतील. आजच्या मॅचसाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर ऑस्ट्रेलियाकडून नियमित कर्णधार आरोन फिंचचे कमबॅक झाले आहे. फिंचयापूर्वी दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. (IND vs AUS 3rd T20I Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल?)

टीम इंडियाने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली असल्याने विराटसेनेपुढे सलग तिसऱ्यांदा विरोधी टीमविरुद्ध क्लीन स्वीप करण्याची संधी आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेपूर्वी पुन्हा लय मिळविण्याबरोबर सन्मानाची लढाई जिंकण्यासाठी मैदानावर उतरेल. ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल झाला आहे. मार्कस स्टोइनिसच्या जागी नियमित कर्णधार फिंच संघात परतला आहे. दुसरीकडे, विराटसेनेच्या विजयी संयोजनात कोणताही बदल झालेला नाही. शिखर धवन-केएल राहुलच्या जोडीवर पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. तर हार्दिक पांड्याकडून फिनिशेरची भूमिका बजावण्याची अपेक्षा असेल.

पाहा टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डार्सी शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, सीन एबॉट, मिच स्वीपसन, अँड्र्यू टाय आणि अ‍ॅडम झांपा.

भारत: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif