IND vs AUS 3rd ODI: कॅनबेरामध्ये हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांचे धमाकेदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत टीम इंडियाची 302 धावांपर्यंत मजल

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे सुरु असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 302 धावांपर्यंत मजल मारली आणि यजमान टीमपुढे विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले.

रवींद्र जडेजा, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील कॅनबेराच्या मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे सुरु असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 302 धावांपर्यंत मजल मारली आणि यजमान टीमपुढे विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले. सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाजी क्रम गडगडला, पण कोहली आणि नंतर हार्दिक-जडेजा या जोडीच्या जबरदस्त खेळीने टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. कर्णधार कोहलीने 63 आणि हार्दिकने नाबाद 92 धावा केल्या. जडेजाने हार्दिकला चांगली साथ दिली आणि नाबाद 66 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा चेंडूने वर्चस्व गाजवले आणि भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. अ‍ॅश्टन अगरने (Ashton Agar) सर्वाधिक 2 तर जोश हेझलवूड, सीन अ‍ॅबॉट आणि अ‍ॅडम झांपा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीची 11 वर्षांची शतकी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपुष्टात, 2020 मध्ये टीम इंडिया कर्णधार वनडे सेन्चुरी करण्यात अपयशी)

क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघासाठी मयंक अग्रवालच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या शुभमन गिलने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात केली, पण दोघे अपयशी ठरले. अवघ्या 26 धावांवरअ‍ॅबॉटने धवनला 16च्या वैयक्तिक धावसंख्यावर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. गिलची आश्वासक फटकेबाजी करत होता, पण अगरने भारताची जमलेली जोडी फोडली आणि गिलला 33 धावांवर माघारी धाडलं. गिल माघारी परतल्यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने झुंज सुरु केली, पण झांपाच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात अय्यर फसला आणि मार्नस लाबुशेनकडे झेल देत माघारी परतला. केएल राहुलनेही निराशा केली. राहुल आजच्या सामन्यात 5 धावाच करू शकला.

एका बाजूने विकेट पडत असताना विराटने एक बाजू धरून संयमी खेळी केली आणि सलग दुसरे अर्धशतक ठोकले. हेजलवूडने विराटला विकेटकीपर अ‍ॅलेक्स कॅरीने झेलबाद करत मोठे यश मिळवून दिले. यानंतर हार्दिक आणि जडेजाच्या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा मोलाची भूमिका बजावली. दोघांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजीला सुरुवात केली आणि शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या तीनशे पार नेली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif