IND vs AUS 3rd ODI 2019: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आर्मीची कॅप घालून मैदानात उतरणार, MS Dhoni ने केलं camouflage capsचं वाटप (Watch Video)

या सामन्याचा टॉस भारताने जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

MS Dhoni Hands Specially Designed Army Caps (Photo Credits: Twitter)

India vs Australia Ranchi ODI: भारत (India) विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Australia)एकदिवसीय सामन्यामधील तिसरा सामना आज रंगणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्याने आज तिसरा तिसरादेखील खिशात घालत मालिकेवर अधिराज्य मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. मात्र केवळ मालिका जिंकण्यासाठी नव्हे तर अजून एका खास कारणासाठी आजचा सामना विशेष ठरणार आहे. कारण आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या (Pulwama Terror Attack) निषेधार्थ आणि शहीद जवानांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता खेळाडू खास आर्मीची कॅप घालून मैदानात उतरणार आहेत. याद्वारा भारतीयांना शहीदांच्या कुटुंबाकरिता National Defence Fund मध्ये योगदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.

14 फेब्रुवारी दिवशी सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 40 भारतीय जवान जागीच ठार झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध तणावाचे झाले आहेत. भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात टाळावे याकरिता आयसीसीकडे आवाहन करणारी याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली आहे. India vs Australia 3rd ODI 2019: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकत भारतीय संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आज ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत तिसरा एकदिवसीय सामना रांचीमध्ये रंगणार आहे. या सामन्याचा टॉस भारताने जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.