IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट लढतीआधी टीम इंडियाची कसून मेहनत, ‘हा’ युवा फलंदाज दिसला सराव करताना, पहा Photos व Video
पहिल्या कसोटी सामन्यात अपमानास्पद पराभवानंतर भारतीय संघ दुसर्या कसोटी सामन्यासाठी मेलबर्न पोहचला आहे आणि खेळासाठी कसून सरावाची तयारी सुरू केली आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल देखील यावेळी सराव करताना दिसला. “आम्ही मेलबर्नमध्ये आहोत आणि आता रेड बॉल टेस्ट सुरू होताना पुन्हा सामूहिक होण्याची वेळ आली आहे,” बीसीसीआयने ट्विट केले.
IND vs AUS 2nd Boxing Day Test: पहिल्या कसोटी सामन्यात अपमानास्पद पराभवानंतर भारताने (India) मागील निकालावर लक्ष न देणे आणि आगामी बॉक्सिंग डे कसोटीवर (Boxing Day Test) लक्ष केंद्रित करणे महत्त्वपूर्ण ठरेल. हा संघ आधीच दुसर्या कसोटी सामन्यासाठी मेलबर्न पोहचला आहे आणि खेळासाठी कसून सरावाची तयारी सुरू केली आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) देखील यावेळी सराव करताना दिसला. “आम्ही मेलबर्नमध्ये आहोत आणि आता रेड बॉल टेस्ट सुरू होताना पुन्हा सामूहिक होण्याची वेळ आली आहे,” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट केले. मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी भारताला दुसर्या डावात 36 धावांवर गुंडाळले गेले आणि ऑस्ट्रेलियाला (Australia) 1-0 ने पुढे जाण्यासाठी 21 ओव्हरयामध्ये 90 धावांचे लक्ष्य गाठले. (India Likely Playing XI for 2nd Test: बॉक्सिंग डे टेस्टमध्ये होऊ शकतात मोठे बदल; केएल राहुल, रिषभ पंतसह ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान)
26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे सामन्याआधी टीम इंडिया काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि असे दिसते आहे की भारतीय संघाला दुसर्या कसोटी सामन्यात दुसरा सलामीवीर मिळाला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शुभमन गिल नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शुबमन गिल बॉक्सिंग डे कसोटीत मयंक अग्रवालचा जोडीदार असणार हे जवळजवळ निश्चित दिसत आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळलेल्या दुसर्या सराव सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शुभमनने चांगली कामगिरी केली होती आणि पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पृथ्वी शॉला पसंती दिली. मात्र, पृथ्वीच्या अपयशानंतर शुभमनला अखेर पदार्पणची संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. पाहा व्हिडिओ:
टीम इंडिया
दरम्यान, उर्वरित सामन्यांपर्यंत विजय मिळविणे भारतासमोर मोठे आव्हान आहे. बीसीसीआयने पितृत्व रजेनंतर कर्णधार विराट कोहलीशिवाय संघ उर्वरित सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहे. शिवाय, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामी फलंदाज डेविड वॉर्नर फिट झाला नसल्याने यजमान संघासाठी जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड सलामीसाठी मैदानात उतरतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)