IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग डे टेस्टसाठी भारताचा Playing XI जाहीर, पहा कोण इन कोण आऊट

पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिल याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. शिवाय, दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज देखील कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल.

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसरी बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्याच्या सुरुवातीला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि भारतीय संघाने (Indian Team) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अ‍ॅडिलेड ओव्हल येथील पराभवानंतर अपेक्षेनुसार भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले आहेत. पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) बाहेरचा रास्ता दाखवत त्याच्या जागी शुभमन गिल (Shubman Gill) याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. शिवाय, दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल. विराट कोहली पितृत्व रजेवर असल्याने उपकर्णधार रहाणे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल. विकेटकीपर म्हणून रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतची (Rishabh Pant) संघात निवड झाली आहे, तर चकित करत भारताने रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. म्हणजे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारत आठ फलंदाज आणि तीन गोलंदाजांसह मैदानात उतरेल. महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीला वगळण्यात आले असून मयंक अग्रवालसह शुभमन गिल सलामीला येईल किंवा संभाव्यत: हनुमा विहारी एमसीजी येथे 2018 च्या कसोटी प्रमाणे सलामीला येण्याची शक्यता आहे. (IND vs AUS 2nd Test 2020-21: टीम इंडिया 'या' 3 कारणांमुळे बॉक्सिंग डे टेस्ट जिंकण्याचा आहे दावेदार, वाचा सविस्तर)

दुसरीकडे, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही मेलबर्न कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची पुष्टी करत संघाच्या विजयी संयोजनात कोणताही बदल करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. म्हणजेच दुखापतीमुळे नियमित सलामी फलंदाज डेविड वॉर्नर दुसऱ्या टेस्ट सामन्यालाही मुकणार असल्याचे निश्चित झालं. वॉर्नरच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा जो बर्न्ससह मॅथ्यू वेड सलामीला मैदानात उतरेल. शिवाय, पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावांवर रोखलेल्या गोलंदाजांकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या अपेक्षा असतील. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क वेगवान विभाग सांभाळतील तर नॅथन लायन आपल्या फिरकीत भारतीय फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न करेल.

पाहा भारतीय संघाचा प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.