IND vs AUS 2nd Test 2020: 'मी अजिंक्यचं कौतुक करणार नाही,' ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेच्या आश्वासक नेतृत्वानंतर सुनील गावस्कर यांचे मोठे विधान
सुनील गावस्कर देखील रहाणेच्या कर्णधारपदाच्या शैलीने प्रभावित झाले आहेत, पण त्यानं त्याचे कौतुक करावेसे वाटले नाही जेणेकरुन लोक त्याच्यावर आरोप करु नये की तो त्याच्या मुंबईकर जोडीदाराला पाठिंबा देत आहे.
IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याचे जोरदार कौतुक केले. माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) देखील रहाणेच्या कर्णधारपदाच्या शैलीने प्रभावित झाले आहेत, पण त्यानं त्याचे कौतुक करावेसे वाटले नाही जेणेकरुन लोक त्याच्यावर आरोप करु नये की तो त्याच्या मुंबईकर जोडीदाराला पाठिंबा देत आहे. गावस्कर म्हणाले की, त्याचे कौतुक करण्यास घाई होईल म्हणून त्यांनी थोडा वेळ थांबणे पसंत केले. एमसीजीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेने आपल्या नेतृत्व कौशल्यची झलक दाखवत गोलंदाजीत बदल, फिल्डींग प्लेसमेंट करत कांगारुं संघाला वरचढ व्हायची एकही संधी दिली नाही आणि पहिल्या डावात 195 धावांवर रोखलं. विराट कोहली पितृत्व रजेवर असल्याने अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (IND vs AUS 2nd Boxing Day Test: मोहम्मद सिराजच दणक्यात पदार्पण, गोलंदाजाच्या प्रति कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 'या' जेश्चरने जिंकली यूजर्सची मनं)
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर खेळाचं विश्लेषण करताना गावस्कर म्हणाले की, “सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लगेच निष्कर्षापर्यंत पोहचण्याची घाई करायला नको. आता मी अजिंक्यचं कौतुक करून तो खूप चांगला कर्णधार आहे असं म्हटलं तर माझ्यावर मी मुंबईच्या खेळाडूंना पाठींबा देतो असा आरोप होईल, त्यामुळे सध्यातरी मला या गोष्टींमध्ये अडकायचं नाहीये.” रहाणेच्या फिल्डर्सच्या प्लेसमेंटने गावस्कर प्रभावित झाले कारण मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेगवेगळ्या जागी तैनात फिल्डर्सने झेलबाद केले. गावस्कर पुढे म्हणाले की, "मागील दोन टेस्ट आणि वनडे सामन्यात त्याने ज्या प्रकारे कर्णधार म्हणून काम केले त्यावरून क्षेत्ररक्षकांना कोठे ठेवावे याचा त्याला चांगलाच अंदाज आहे."
रहाणेने त्याच्या गोलंदाजीतील बदलांमुळेही प्रभावी केले. खेळाच्या पहिल्या तासातच त्याने आर अश्विनकडून गोलंदाजी करून घेतली आणि आणि ज्येष्ठ फिरकी गोलंदाजाने मॅथ्यू वेड व स्मिथला बाद केल्या ज्यामुळे ऑस्ट्रेलियालाने अवघ्या 38 धावांवर तीन विकेट गमावले. पहिल्या दिवसाच्या लंचपूर्वी रहाणेने पदार्पणवीर मोहम्मद सिराजला देखील एक ओव्हर दिली. गोलंदाजीच्या प्रयत्नांना पहिल्या दिवशी भारताच्या यशाचे श्रेय देणे महत्त्वाचे असल्याचे गावस्कर म्हणाले. 71 वर्षीय माजी कर्णधार म्हणाले, "केवळ अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसी पलीकडे पाहणे भारतासाठी महत्वाचे आहे. अश्विनने ज्या प्रकारे बुमराहला गोलंदाजी केली, त्याच प्रकारे सिराजने पदार्पण केले. म्हणजे कल्पना करा, एक नवीन बॉल गोलंदाज असून दुसर्या सत्रापूर्वी तुम्हाला एकही चेंडू टाकण्याची संधी मिळणार नाही. फक्त दुसऱ्या सत्रातच आपल्याला 27व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला मिळेल परंतु ज्याप्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे."