IND vs AUS 2nd Test 2020: मॅथ्यू वेडेचा झेल घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्यात झाली टक्कर, अष्टपैलूने पकडलेला सुपर कॅच पाहून तुम्हीही म्हणाल-‘कडक’
झेल घेतल्यानंतर हे दोघे एकत्र सेलिब्रेट करताना दिसले.
IND vs AUS 2nd Test 2020: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानात (Melbourne Cricket Ground) खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी संघाला दमदार सुरुवात करुन कांगारू संघाच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जसप्रीत बुमराह सातत्याने चांगली गोलंदाजी करत असून अश्विनने दोन आणि बुमराहला एक विकेट मिळाली. या दरम्यान, अश्विनने ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू वेडला (Matthew Wade) माघारी धाडलं, पण त्याचा कॅच पकडताना पदार्पणवीर शुभमन गिल (Shubman Gill) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात धडक झाली, पण अनुभवी भारतीय फिल्डरने कॅच सोडला नाही आणि उत्कृष्ट कॅच पकडत कांगारू सलामी फलंदाजाला माघारी धाडलं. (IND vs AUS 2nd Test Day 1: टीम इंडियाची दमदार सुरुवात; लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 65 धावांवर गमावल्या 3 विकेट, स्टिव्ह स्मिथ पुन्हा फेल)
12व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असलेल्या अश्विनच्या चौथ्या चेंडूवर वेडने चौकार मारला, मात्र अश्विनने त्याला पुढच्याचा चेंडूवर वेडला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अश्विनने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर वेडने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू उंच उडाला. हे पाहून मिड-विकेटला कॅच घेण्यासाठी जडेजा आणि शुभमनने धाव घेतली. जडेजाने कॉल देत हा त्याचा झेल असल्याचे सांगितले, पण युवा शुभमनचे लक्षही चेंडूवर असल्याने तो इशारा पाहू शकला नाही आणि दोघांमध्ये धडक झाली मात्र, जडेजाने आपल्या हाती आलेला कॅच खाली पडू दिला नाही. झेल घेतल्यानंतर हे दोघे एकत्र सेलिब्रेट करताना दिसले. पाहा जडेजाचा सुपर कॅच:
मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत. या संघात शुभमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंतचा समावेश आहे. शेवटच्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याच्या कामगिरीमुळे निराश केलेल्या पृथ्वी शॉला दुसरी संधी मिळाली नाही. यासह हनुमा विहारीला देखील बाहेर केले आहे. पितृत्व रजेमुळे मायदेशी परतलेल्या विराट कोहलीच्या जागी जडेजाला, तर जखमी शमीच्या जागी सिराजला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.