IND vs AUS 2nd Test 2020: टिम पेन नॉट आऊट पण रहाणे आऊट? अजिंक्यच्या विकेटवरून Netizens चा थर्ड अंपायर सायमन टॉफेलवर पक्षपातचा आरोप
रहाणेच्या विकेटने सोशल मीडिया यूजर्समध्ये चर्चेला सुरुवात केली आणि थर्ड अंपायर सायमन टॉफेल यांच्यावर पक्षपात करण्याचा आरोप केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनला एकीकडे नॉटआऊट दिल असताना रहाणे कसा आऊट असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला.
IND vs AUS 2nd Test 2020: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय (India) प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुर्दैवी रनआऊट होऊन माघारी परतला. रहाणेने शतकी खेळी करत 112 धावा केल्या. मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) तिसऱ्या दिवशी रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी 277 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या 99व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळाले. अर्धशतक पूर्ण करण्याच्या घाईत जडेजाने एक चोरटी धाव घेण्यासाठी रहाणेला कॉल दिला. शतकवीर रहाणेने देखील सकारात्मक प्रतिसाद देत क्रीज सोडली. तथापि स्ट्रायकरच्या दिशेने मार्नस लाबूशेनने थ्रो थेट टिम पेनकडे (Tim Paine) केला ज्याने उर्वरित कामगिरी केली. मात्र, रहाणेच्या विकेटने सोशल मीडिया यूजर्समध्ये चर्चेला सुरुवात केली आणि थर्ड अंपायर सायमन टॉफेल यांच्यावर पक्षपात करण्याचा आरोप केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनला एकीकडे नॉटआऊट दिल असताना रहाणे कसा आऊट असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. (Ajinkya Rahane Run-Out: रवींद्र जडेजाच्या चुकीने रनआऊट झाल्यावर अजिंक्य रहाणेने आपल्या कृतीने पुन्हा जिंकून घेतली सर्वांची मनं, पहा व्हायरल Photo)
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कर्णधार पेन धावबाद असतानाही थर्ड अंपायरने त्याला नाबाद दिले. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर शेन वॉर्न, वसीम जाफरपासून अनेक क्रीडा विशेषज्ञ आणि चाहत्यांकडून निराशा व्यक्त करण्यात आली. त्यांनतर भारताच्या डावा दरम्यान, रहाणेवर देखील तीच स्थिती ओढवली, पण यंदा थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित करत माघारी धाडलं, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये पेनसाठी एक आणि रहाणेसाठी एक न्याय असल्याची चर्चा सुरु झाली.
पक्षपात
रहाणे 'आऊट' पेन 'इन'
ढोंगीपणा
राहणे-पेन
बाद-नाबादचा खेळ
आपला स्वतःचा अंपायर असल्याचे फायदे
पक्षपाती निर्णय
सायमन टॉफेल स्पष्टीकरण
दरम्यान, रहाणे बाद झाल्यावर अवघ्या 30 धावांवर भारताने पुढे पाच विकेट गमावल्या आणि संघाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रहाणेने कॅप्टन्सी इनिंग खेळत 112 धावांची शतकी खेळी केली, तर जडेजाने 57 धावा केल्या. अशाप्रकारे, भारताने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 195 धावांच्या प्रत्युत्तरात 131 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सने 2 आणि जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.