IND vs AUS 2nd Test 2020: अजिंक्य रहाणेचे ऑस्ट्रेलियात डंका, MCG मध्ये सचिन तेंडुलकर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय कर्णधार

विशेष म्हणजे रहाणेचे कर्णधार म्हणून हे पहिले शतक होते तर 1999 मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा रहाणे दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

अजिंक्य रहाणे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd Test 2020: भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Tets) मॅचच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी करिअरमधील रहाणेने 195 चेंडूत आपले 12 वे शतक पूर्ण केले, ज्यात 11 चौकारांचा समावेश होता. रहाणेचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे दुसरे टेस्ट शतक ठरले. यापूर्वी 2014 मध्ये रहाणेने कांगारू संघाविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शंभरी गाठली होती. रहाणेने 195 चेंडूत चौकार मारत मैलाचा दगड गाठला विशेष म्हणजे रहाणेचे कर्णधार म्हणून हे पहिले शतक होते तर 1999 मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा रहाणे दुसरा भारतीय कर्णधार ठरला. रहाणेने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार मारले. रहाणे आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यातील सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारीने पहिल्या डावात कांगारू संघावर भारताने आघाडी 50 पार नेली आहे. (IND vs AUS 2nd Boxing Day Test Day 2: विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना जे शक्य झाले नाही ते अजिंक्य रहाणेने करून दाखवले!)

यापूर्वी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कर्णधार म्हणून अखेरीस मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शंभरी गाठली होती. सचिनने 116 धावांची खेळी केली होती. त्यानंतर एकही भारतीय कसोटी कर्णधाराला मेलबर्नमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे, गेल्या 21 वर्षांपासून सचिनची अतूट कामगिरी आता रहाणेच्या नावावर देखील झाली आहे. रहाणेने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.  2014 मध्ये कांगारू संघाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले आणि 147 धावा केल्या.

टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली पॅटर्निटी रजा घेत मायदेशी परतला असल्याने उपकर्णधार रहाणेला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रहाणे तिसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे. रहाणेने यापूर्वी 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, त्यांनतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोर टेस्ट सामन्यात रहाणेच्या नेतृत्वात संघाने डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला होता.