IND vs AUS 2nd T20I Probable Playing XI: दुसऱ्या टी-20 साठी असा असू शकतो टीम इंडियाचा प्लेइंग 11, 'हा' खेळाडू घेणार रवींद्र जडेजाचे स्थान

भारतीय संघ या सामन्यात रवींद्र जडेजाशिवाय मैदानावर उतरेल. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली या महत्वाच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश करेल याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टी-20 (Photo Credit: Instagram)

IND vs AUS 2nd T20I Probable Playing XI: कॅनबेरामधील टी-20 सामना जिंकल्यावर टीम इंडिया (Team India) आता मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) उतरण्यास सज्ज आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ (Indian Team) मालिकेत विजयी आघाडी घेईल, तर ऑस्ट्रेलियाकडे (Australia) मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. भारतीय संघ या सामन्यात रवींद्र जडेजाशिवाय (Ravindra Jadeja) मैदानावर उतरेल. मनुका ओव्हल येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात जडेजाला दुखापत झाली ज्यानंतर त्याला उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली या महत्वाच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश करेल याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. शिवाय, युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यावरही सस्पेन्स कायम आहे. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 ने पराभवाला सामोरे जाणाऱ्या भारतीय संघाकडे टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. (IND vs AUS 2nd T20I: युजवेंद्र चहल आता लवकरच मोडणार जसप्रीत बुमराह याचा 'हा' विक्रम; वाचा सविस्तर)

शिखर धवन आणि केएल राहुल सलामी जोडी म्हणून टी-20 मालिकेच्या दुसर्‍या सामन्यातही मैदानावर उतरेल. स्वतः कर्णधार कोहली तिसऱ्या नंबरची जबाबदारी सांभाळेल. चौथ्या क्रमांकावर पुन्हा संजू सॅमसन आणि पाचव्या क्रमांकावर मनीष पांडे दिसू शकतात. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरला बाहेर बसावे लागेल, तर सहाव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून हार्दिक पांड्याला संधी मिळेल. जडेजाच्या जागी आजच्या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर ऑलराउंडरची भूमिका बजावताना दिसेल, तर विराट प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहचा कसा समावेश करतो हे पाहणे ही औत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या गोलंदाजी विभागात जडेजाच्या जागी चहलला संधी मिळू शकते, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, टी नटराजन आणि दीपक चाहरचा पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. अशा परिस्थितीत बुमराहला पुन्हा बाहेर बसावे लागेल किंवा शमीला कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते.

भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), सजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि टी नटराजन.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif