IND vs AUS 2nd T20I: मॅथ्यू वेडची एकाकी झुंज, स्टिव्ह स्मिथची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियाचे टीम इंडियापुढे 195 धावांचं तगडं आव्हान
आरोन फिंचच्या अनुपस्थित आजच्या यजमान संघाचे नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने जबरदस्त फलंडनजी करत अर्धशतकी खेळी केली. वेडने 58 धावा केल्या.
IND vs AUS 2nd T20I: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिले फलंदाजी करत 5 विकेट गमावून 194 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियापुढे (Team India) 195 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. आरोन फिंचच्या अनुपस्थित आजच्या यजमान संघाचे नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने (Matthew Wade) जबरदस्त फलंडनजी करत अर्धशतकी खेळी केली. वेडने 58 धावा केल्या तर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) 46 धावा करून परतला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) स्मिथला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला आणि 22 धावा केल्या. मोईसेस हेनरिक्स 26 धावा करून परतला. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि यजमान संघाच्या धावगातील वेसण घातली. भारतासाठी टी नटराजनने (T Natarajan) 2 तर युजवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND-A vs AUS-A Tour Match: पृथ्वी शॉ, शुभमन गिल शुन्यावर आऊट; अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीला चेतेश्वर पुजाराची साथ)
टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघासाठी वेड आणि डार्सी शॉर्टने चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांची पहिल्या ओव्हरपासून धुलाई करत दोघांनी आक्रमक सुरुवात केली. 47 धावांवर नटराजनने शॉर्टला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. शॉर्ट माघारी परतल्यानंतरही वेडची फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. मात्र, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात अतिरीक्त बाऊंसमुळे वेड फसला आणि चेंडूला बॅटची कड लागून उडाला, पण विराट कोहलीने मॅथ्यूचा सोपा झेल सोडला. मात्र, या गोंधळात एक चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात वेड आणि स्मिथ यांच्यात गोंधळ झाल्याने अखेरीस वेडला धावबाद करण्यात भारताला यश मिळाले. वेडने 32 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या.
कर्णधार वेड माघारी परतल्यावर स्मिथ आणि मॅक्सवेलने फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले. पण, शार्दूलने मॅक्सवेलला बाद करून जोडी फोडली. 13 चेंडूत 2 षटकारांसह 22 धावांची खेळी करत मॅक्सवेल माघारी परतला. मोक्याच्या क्षणी चहलने कांगारू संघाला चौथा धक्का देत फटकेबाजी करणाऱ्या स्मिथला हार्दिक पांड्याकडे कॅच आऊट केलं आणि स्मिथचं अर्धशतक चार धावांनी हुकलं. स्मिथने आपल्या खेळी 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये डेब्यू करणारा डॅनियल सॅम्स नाबाद आणि मार्कस स्टोइनिस नाबाद धावा करून परतला.