IND vs AUS 2nd ODI: श्रेयस अय्यरच्या Bulls-Eye ने डेविड वॉर्नर रनआऊट होऊन माघारी, पाहून तुम्हीही म्हणाल WOW!
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा यजमान सलामी जोडीने टीमला दमदार सुरुवात करून दिली. दुसर्या वनडे सामन्यात भारताला वॉर्नरची विकेट मिळवण्यासाठी भारताला काहीतरी खास गोष्टींची गरज होती आणि श्रेयस अय्यरने ते मिळवून दिले. वॉर्नरने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरच्या Bulls-eye थ्रोने रनआऊट झाला.
IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार आरोन फिंच आणि त्याचा सलामी जोडीदार डेविड वॉर्नर (David Warner) यांचा फॉर्म सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा यजमान सलामी जोडीने टीमला दमदार सुरुवात करून दिली. दोंघांमध्ये मालिकेत सलग दुसऱ्यांदा शतकी भागीदारी झाली. सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या दुसर्या वनडे सामन्यात भारताला वॉर्नरची विकेट मिळवण्यासाठी भारताला काहीतरी खास गोष्टींची गरज होती आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ते मिळवून दिले. त्याच मैदानावर शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात 69 धावा काढल्यानंतर वॉर्नरने पुन्हा अर्धशतक पूर्ण केले आणि शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. वॉर्नर 77 चेंडूत 83 धावा करून खेळत होता जेव्हा रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेंडूवर दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरच्या Bulls-eye थ्रोने रनआऊट झाला. (IND vs AUS 2nd ODI: Ouch! आरोन फिंचच्या पोटावर आदळला नवदीप सैनीचा बाउन्सर, केएल राहुलने अशी घेतली मजा Watch Video)
27 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथने लॉग-ऑफच्या दिशेने चेंडू मारला आणि दोन धाव घेण्यासाठी धावला. नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी पोहोचल्यानंतर स्मिथला थोडं संकोच वाटलं परंतु जेव्हा आपला जोडीदार वॉर्नरला धावताना पाहून त्याने दुसर्या पुढे धावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, श्रेयस बॉलकडे धावत आला, त्याने नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने चूक थ्रो मारून वॉर्नरला माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजाने मोठी उडी टाकली, पण अय्यरने त्याला धावबाद करून संघाला महत्तवपूर्ण विकेट मिळवून दिली. पाहा श्रेयस अय्यरचा 'बुल्स-आय' थ्रो:
दरम्यान, वॉर्नर आणि फिंचने ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा मजबूत सुरुवात करून दिली. तत्पूर्वी, वॉर्नर आणि फिंचने यजमानांना पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी करून टीमला पुन्हा जबरदस्त सुरुवात करून दिली. फिंचला 60 धावांवर परवत मोहम्मद शमीने ही भागीदारी मोडली. वॉर्नर आणि फिंच माघारी परतल्यावर स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन यांनी संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. स्मिथने सलग दुसरे शतक ठोकले. स्मिथने दुसऱ्या वनडे सामन्यात देखील आपला झंजावात सुरुच ठेवला. स्मिथने 62 चेंडूत 13 चौकार आणि एक षटकार मारत शतकी खेळी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)